पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्मृतिदिन विशेषः भारदार आवाजाची देणगी लाभलेला नटश्रेष्ठ

ज्येष्ठ रंगकर्मी दिवंगत दाजी भाटवडेकर

व्यावसायिक रंगभूमीवर आपल्या पहाडी आवाजाने, आणि जबरदस्त अभिनयाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेले नटश्रेष्ठ पद्मश्री दाजी ऊर्फ केशवचंद्र मोरेश्वर भाटवडेकर यांचा जन्म १५ सप्टेंबर १९२१ रोजी झाला. ते मूळचे मुंबईचे. वयाच्या आठव्या वर्षी त्यांनी गिरगावातल्या ब्राह्मणसभेत तासभर कीर्तन करून "बालकीर्तनकार' असा लौकिक मिळवला होता. 

स्मृतिदिन विशेष : सिने-नाट्यसृष्टीतला मुरब्बी कलाकार

१९४४ मध्ये संस्कृत विषय घेऊन ते एम. ए. झाले. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनापासूनच ते अभिनयाच्या क्षेत्रात उतरले होते. व्यावसायिक रंगभूमीवरील ते एक उच्चशिक्षित अभिनेते होते. मुंबई मराठी साहित्य संघाचे डॉ. अ. ना. भालेराव यांनी त्यांना आमंत्रित केले. तेव्हापासून अखेरपर्यंत ते साहित्य संघाशी निगडित राहिले. त्यांचा मराठी, इंग्रजी आणि संस्कृत तशा तिन्ही भाषेचा गाढा अभ्यास होता. स्पष्ट शब्दोच्चार, पहाडी आवाज आणि आपल्या समर्थ अभिनयानी चार तपं त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले.

जयंती विशेष: बंडखोर, बेधडक आणि सशक्त अभिनेत्री

"संगीत संशयकल्लोळ'मधील "फाल्गुनराव', "सौंभद्रा'तील "बलराम', "एकच प्याला'तील "सुधाकर', "मानापमाना'तील "लक्ष्मीधर', "भाऊबंदकी'तील "राघोबा' "बेबंदशाही'मधील "कलुषा कब्जी' 'अंमलदार'मधील 'ढेरेसाहेब' "सुंदर मी होणार'मधील "महाराज' "भावबंधन" नाटकातील 'घनश्‍याम',"मृच्छकटिक" 'मधील शकार',"भाऊबंदकी "नाटकातील 'तुळोजी, राघोबा, सखाराम बापू' "म्युनिसिपालिटी"नाटकातली 'पांडोबा' "लग्नाची बेडी"नाटकातली 'कांचन, गोकर्ण, तिमिर', "स्वयंवर"नाटकातील 'रुक्मी' या त्यांच्या भूमिका अतिशय गाजल्या. 

Happy Birthday: मराठी रसिकांशी गट्टी करणारा कलाकार

"तुझं आहे तुजपाशी" या नाटकातील "काकाजी' ही भूमिका तर त्यांनी अजरामर केली. व्यावसायिक रंगभूमीवर त्यांनी जवळपास ४० नाटकात एकूण ५० भूमिका साकार केल्या. बॉर्न यस्टरडे, कृष्ण द्वीप अशा इंग्रजी आणि हिंदी नाटकांतूनही त्यांनी अविस्मरणीय भुमिका केल्या. इतकंच नाही तर संस्कृत नाटकांमध्येही त्यांनी कामं केली. त्यांनी केवळ संस्कृतमधील नाटकेच केली नाहीत, तर गाजलेल्या मराठी नाटकांचे संस्कृतमध्ये रूपांतर करून त्याचे प्रयोगही केले. "घर गंगेच्या काठी' हा चित्रपट आणि अक्कलकोटच्या स्वामी समर्थांच्या जीवनावरील श्री स्वामी समर्थांची भूमिका यांसारख्या त्यांच्या चित्रपटांतील भूमिकाही गाजल्या. संस्कृत रंगभूमी समोरील समस्यांचा संशोधनपर ग्रंथ त्यांनी तयार केला. वयाच्या सत्तरीनंतर म्हणजे १९९३ मध्ये मुंबई विद्यापीठाची "डॉक्‍टरेट' पदवी त्यांनी मिळवली.

Happy Birthday : हसतमुख खलनायक

काही वर्ष केंद्रीय चित्रपट परिनिरीक्षण मंडळाचे सदस्य होते. तसेच राज्य रंगभूमी प्रयोग परिनिरीक्षण मंडळाचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी काम केले. दुर्दैवाने २६ डिसेंबर २००६ रोजी त्यांच्या अभिनय प्रवासाला पूर्णविराम लागला. अशा या भारदार आवाजाची देणगी लाभलेल्या, रंगभूमीच्या पडत्या काळात तिला सावरण्याचे काम करणाऱ्या विचारवंत रंगकर्मीला मानाचा मुजरा....

#नाट्यकर्मीविजू