पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

स्मृतिदिन : भूमिकेशी समरसून काम करणारा असामान्य कलाकार

गणेश गोविंद बोडस (फोटो - विजय पटवर्धन यांच्या फेसबुक वॉलवरून साभार)

जे करायचे ते चांगलंच, उठावदार आणि समरसून करायचं अशा भूमिकेतून एका दिग्गज कलाकाराने संगीत रंगभूमीवरची व्यक्तिचित्रे अजरामर केली. गाता गळा नसतानाही कृष्णाच्या पदांना 'वन्समोअर' मिळवले. हा असामान्य कलाकार होता गणेश गोविंद बोडस ऊर्फ गणपतराव बोडस. २ जुलै १८८० ला त्यांचा जन्म झाला. त्यांनी १८९५ साली किर्लोस्कर नाटक मंडळीच्या नाटकांतून नाट्यक्षेत्रात पदार्पण केलं. १९१३ साली गंधर्व नाटक मंडळी स्थापन करण्यात गोविंदराव टेंब्यांसह त्यांनी बालगंधर्वांना सहाय्य केलं. प्रेमशोधन, एकच प्याला, मतिविकार, मानापमान, विक्रमशशिकला, संशयकल्लोळ, स्वयंवर ह्या नाटकांमध्ये सहाजिकच उत्कृष्ट काम केलं. पण त्यांची नाटकाविषयीची ओढ एवढी प्रचंड होती की, या जबरदस्त कलाकाराने अनेक नाटकांमधे अनेक भूमिका केल्या किंवा अनेक नाटकांमधल्या काही नाटकांमधे अनेक भूमिका केल्या असंही म्हणता येईल.

गिरीश- सयाजींची 'इन्स्टिट्यूट ऑफ पावटॉलॉजी'

असं म्हणण्याचं कारण म्हणजे, त्यांनी 'गुप्‍तमंजूष' नाटकात मेघनाद आणि शृंगी. 'चंद्रहास' नाटकात थोरला, दुष्टबुद्धी, भटजी, मदन आणि मांग. 'रामराज्यवियोग' नाटकात कुमुदवती, दशरथ आणि मालिनी. 'विक्रमोर्वशीय' नाटकात चित्रलेखा, चित्रसेन गंधर्व, नारद आणि राणी. 'विद्याहरण' नाटकात शिष्यवर्य आणि शुक्राचार्य. 'मूकनायक' नाटकात प्रतोद आणि विक्रांत. 'मृच्छकटिक' नाटकात धूता आणि शकार. 'वीरतनय' नाटकात प्रकोप, मालिनी आणि शंभूसेन. 'शापसंभ्रम' नाटकात कादंबरी, चंद्रापीड आणि तरलिका. 'शारदा' नाटकात कांचनभट, गोरख, वल्लरी आणि शंकराचार्य. 'सौभद्र' नाटकात कुसुमावती, कृष्ण, नयना, नारद, राक्षस, रुक्मिणी, सात्यकी आणि सारंग. इतकच नाही तर 'शाकुंतल' नाटकात ,त्यांनी दुष्यंत, शकुंतला, ओटी भरणारी बाई, दासी, यवन स्त्री, विदूषक व सर्वदमन यांखेरीज सर्व भूमिका केल्या होत्या.

मी पाहिलेले उद्धव ठाकरे हे नाहीत: देवेंद्र फडणवीस

अशा अष्टपैलू कलाकाराच्या रंगभूमीवरील योगदानाची दखल घेत संगीत नाटक अकादमीने १९५६ साली त्यांना संगीत नाटक अकादमी पुरस्कार देऊन गौरवलं. १९४० साली नाशिक इथे झालेल्या ३१ व्या मराठी नाट्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. १९५६ मध्ये नांदेड इथे भरलेल्या मराठवाडा नाट्यसंमेलनाचेही ते अध्यक्ष होते. त्यांनी लिहिलेलं 'माझी भूमिका ' हे त्यांचे आत्मचरित्र १९४० साली प्रकाशित झालं. मराठी कलावंताने लिहिलेलं हे पहिलंच आत्मचरित्र आहे. २३ डिसेंबर १९६५ रोजी ह्या असामान्य कलाकाराने जगाच्या रंगभूमीला अखेरचा सलाम केला....अशा ह्या दिग्गज कलाकाराला मानाचा मुजरा...

#नाट्यकर्मीविजू

- विजय पटवर्धन, पुणे