पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Blog : ...पण तू 'अबोल' राहून योग्य उत्तर दिले !

दीपिका पादुकोन

दीपिका तुला काय वाटले की, तू JNU मध्ये जाशील आणि तुझ्या चित्रपटाचे खूप मोठे प्रमोशन करशील?... तुझ्या "छपाक" ला खूप मोठे यश मिळेल असे तुला वाटले  खरे पण तू एका भ्रमात होती याची जाणीव तुला आता झाली असेल.  अगं तुला काय इतिहास माहिती नव्हता का, की तू इतिहासाकडे कानाडोळा करून आयशी घोषला भेटायला गेली?

रामायणातल्या सीताला पण लोकांनी सोडले नाही,  बिचारीला अग्निपरीक्षा देऊन स्वतःला सिद्ध करून दाखवावे लागले. तू तर कलयुगातील सर्वसाधारण स्त्री आहेस. तुझ्या 'छपाक'मध्ये तू एका मुलीवर होणारा अत्याचार दाखवला आहे, मात्र अत्याचारास  भीक न घातला  हक्कासाठी लढणाऱ्या एका मुलीची सक्षम कहाणी तू लोकांपर्यंत पोहोचवली आहे. म्हणूनच का होईना तू तिच्या वेदना समजून घेण्यासाठी तिला भेटायला गेली. 

Happy Birthday : गुडलकचा राजा!

'छपाक' वर तू स्वतः  इतके पैसे लावले,  सध्याचे सरकार या चित्रपटावर बंदी आणेल. आपल्या बाबतीत प्रतिकूल वातावरण निर्माण होऊ शकेल, विविध पक्षांचे कार्यकर्ते चित्रपट गृहाबाहेर गोंधळ घालून चित्रपट चालू देणार नाहीत म्हणजेच BOYCOTT करतील पण याचा विचार न करता तू JNU च्या विद्यार्थ्यांसोबत उभी राहिली याचं विशेष कौतुक.आपला इतिहास हेच सांगतो की एखाद्या स्त्रिने आवाज उठवला तर त्या स्त्रिला बदनाम करायचे आणि समाजकंटकांनी ते वेळोवेळी, न चुकता केले आहे. तुझ्यावर तर किती खालच्या पातळीला जाऊन लोकांनी तोंडसुख घेतले, किती टीकाटिप्पणी केली. पण तू त्यांना "अबोल" राहून योग्य उत्तर दिले.

बाकी चित्रपटातील कथा ही सत्य घटनेवर आधारित आहे. चित्रपटातील पात्र रंगवताना नक्कीच तुझ्या मनात आले असेल की, हा प्रसंग कोणावरच येऊ नये. लक्ष्मी अग्रवालला त्यावेळी काय यातना झाल्या असतील ते फक्त तिला आणि हे पात्र चित्रपटात रंगवले म्हणून तुलाच समजल्या असतील. त्यादिवशी माध्यमात तुझ्या डोळ्यातले वाहणारे पाणी दाखवत होते. घोषच्या आणि तिथल्या विद्यार्थ्यांना झालेल्या यातना पाहून तुझ्या डोळ्यात पाणी आलेही असेल पण तो तुझा खोटा अभिनय नव्हता हे समजून घेण्याइतपत काळीज या लोकांकडे  नाहीये. 

अग्गबाई! सासूबाईंचं ठरलं लग्न, सूनबाई शुभ्रा होणार करवली

बाकी तुझा आणि अजयच्या चित्रपटाची तुलना करून 'तान्हाजी' चित्रपट का पहावा यावर सध्या सोशल मीडियामध्ये जोरदार चर्चा आहे. पण तान्हाजी मालूसरेंना वीरगती मिळाल्यावर सावित्री मालूसरेंना पण वेदना झाल्याचं असतील ना? शिवाजी महाराजांनी परस्त्रीचा स्वतःच्या आई प्रमाणे सन्मान केला. तान्हाजी मालुसरे हे त्यांचेच मावळे.  मात्र  दुर्दैवाने अमुक एक चित्रपट पाहा असं सांगणाऱ्या  लोकांना तुझा आदर करता येत नाहीये. स्त्रियांचा आदर करा असं तुही चित्रपटातून सांगितले,  माझ्या तुझ्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष करत लोक तुझ्यावर शाब्दिक चिखलफेक करत आहेत. 

असो..... पण तूझा 'छपाक'मधला  अभिनय  खूप छान आहे, तू अत्यंत नाजूक पण तितकाच महत्त्वाचा विषय प्रेक्षकांसमोर अत्यंत समर्थपणे मांडला. आज  लोक टीकाही करतील मात्र तू ज्या समर्थपणे एक ठोस भूमिका घेतली, त्यासाठी तुझं विशेष कौतुक.