पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अफलातून नाटककार 'दि ग्रेट बबन प्रभू' !

बबन प्रभु

लॉरेल-हार्डी जोडीतल्या स्टॅन लॉरेलसारखाच मूर्तिमंत भोळा भाबडा चेहरा, कृश शरीरयष्टी आणि शब्दफेकीची एक खास वेगळीच लकब आणि रंगमंचावर प्रवेश करताच प्रेक्षागृहात हातखंडा हशा पिकवणारा अफलातून कलाकार. एवढं वर्णन ऐकलं तरी एका झटक्यात आपल्याला एकच माणूस आठवतो, तो म्हणजे, मराठीत "फार्स" या भन्नाट नाट्यप्रकाराला जबरदस्त लोकप्रियता मिळवून देणारा अफलातून नट आणि नाटककार म्हणजे, साळबा विनायक प्रभू अर्थात् दि ग्रेट बबन प्रभू. १६ डिसेंबर १९२६ रोजी त्यांचा जन्म झाला. 

माझी मदत न घेता करिअर घडवत आहेत, आमिरला वाटतोय मुलांचा अभिमान

स्टेजवरचा कमालीचा सहज वावर, विनोदनिर्मितीसाठी लागणाऱ्या टायमिंगची उत्तम जाण यामुळे प्रत्येक नाटकात त्यांच्या एंट्रीलाच कडकडून टाळी पडायची आणि त्यानंतर पुढचे दोनएक तास सारं प्रेक्षागृह खुर्चीवर उसळत राहायचं. फार्समध्ये वाचिक, प्रसंगनिष्ठ, कायिक अशा सगळ्या प्रकारच्या विनोदाचा मुक्तहस्ते वापर करून प्रेक्षकांना मनमुराद हसवणाऱ्या या हास्यसम्राटाने दिनूच्या सासूबाई राधाबाई, पळा पळा कोण पुढे पळे तो, चोरावर मोर, घोळात घोळ, माकड आणि पाचर असे एकापेक्षा एक अस्सल फार्स लिहिले आणि आपल्या लाजवाब अभिनयाने गाजवले. त्यात त्यांच्या जोडीला अजून एक अवलिया होता. तो म्हणजे, आत्माराम भेंडे. त्या दोघांचा सगळ्यात गाजलेला फार्स, झोपी गेलेला जागा झाला. त्यामधे दोघे मिळून रंगभूमीवर अक्षरशः धुमाकूळ घालायचे.

जानेवारीत रंगणार दीपिका विरुद्ध अजय आणि रजनीकांत यांचं महायुद्ध

बबन प्रभू साहेबांनी मुंबई दूरदर्शनवरसुद्धा धमाल उडवून दिली होती. रविवारी सकाळी याकूब सईद ह्यांच्याबरोबर ते ‘हास-परिहास’ नावाचा एक तुफान विनोदी कार्यक्रम सादर करत असत. चिमुकला पाहुणा आणि एक दोन तीन या चित्रपटांमध्येही त्यांनी बहार आणली होती. १९८२ साली या विनोदवीरानं आपल्यातून अकाली एक्झिट घेतली, पण आजही त्यांचं नाव घेतलं की वाटतं, आत्ता ते कुठल्यातरी बंद कपाटातून स्टेजवर अचानक एन्ट्री घेतील आणि म्हणतील, "हुश्श.... आतमध्ये जरा पाय मोकळे करून आलो...." विनोदच्या या बादशहाला मानाचा मुजरा...

स्मृतीदिन विशेष : मराठी सिने-नाट्यसृष्टीतील 'विनोदाचा बादशहा'