पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरियन कलाकारांच्या पाठीवर प्रियांकाच्या कौतुकाची थाप

पॅरासाइट

दक्षिण कोरियाचा चित्रपट 'पॅरासाइट'नं नवा इतिहास रचला आहे. ऑस्कर पुरस्कारांच्या इतिहासात पहिल्यांदाच एका बिगर इंग्रजी भाषेतील चित्रपटाला पुरस्कार मिळाला आहे. सर्वाधिक इंग्रजी  भाषेतील चित्रपटांचा बोलबाला असलेल्या या पुरस्कार सोहळ्यावर दक्षिण कोरियाच्या 'पॅरासाइट'नं छाप उमटवली, सहापैकी चार विभागातील ऑस्कर या चित्रपटानं पटकावले आहेत. जगभरात या चित्रपटावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. प्रियांका चोप्रानंही 'पॅरासाइट'च्या संपूर्ण टीमला  शुभेच्छा देत टीमवर कौतुकांचा वर्षाव केला आहे. 

'दरबार'च्या अपयशानंतर रजनीकांत यांच्या आगामी चित्रपटाच्या मानधनात कपात

एक इंग्रजी नसलेला आणि पूर्णपणे कोरियन भाषेत असलेल्या चित्रपटावर जगभरातील प्रेक्षकांनी भरभरून प्रेम केलं ही नक्कीच भारावून टाकणारी बाब आहे. आता प्रतिनिधत्त्व करण्याची वेळ आली आहे. आपली कला ही भाषा आणि जागेची सीमा ओलांडून सर्वदूर पोहचली पाहिजे. पॅरासाइटनं ही बंधनं ओलांडून इतिहास रचला आहे, यासाठी या चित्रपटाचं  कौतुक असा संदेश प्रियांकानं लिहला आहे. 

बाँग हून जो यानं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. सर्वोत्तम चित्रपट, सर्वोत्तम पटकथा, सर्वोत्तम दिग्दर्शक, सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म या विभागात 'पॅरासाइट' नं ऑस्कर पटकावला. 

'देवाक काळजी रे गाण्यानं रचला मराठी संगीत क्षेत्रातील दुर्मिळ विक्रम