पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ऑस्करमध्ये पहिल्यांदाच 'पॅरासाइट'नं रचला इतिहास

पॅरासाइट

यंदाचा ऑस्कर सोहळा हा सर्वार्थानं खास आणि लक्षात राहण्याजोगा ठरला. ९२ वर्षांत पहिल्यांदाच  'पॅरासाइट' या दक्षिण कोरियाच्या चित्रपटानं ऑस्करमध्ये इतिहास रचला.  सर्वोत्तम चित्रपटाचा ऑस्कर पटकावणारा  'पॅरासाइट' हा पहिला परदेशी भाषेतला चित्रपट ठरला. आतापर्यंत इंग्रजी आणि हॉलिवूड चित्रपटांनीच ऑस्करवर नाव कोरलं आहे. मात्र या कोरियन चित्रपटानं जे कधीही घडलं नाही ते करुन दाखवलं. 

ऑस्कर विजेत्यांची यादी 

ऑस्करच्या शर्यतीत पहिल्यांदाच द. कोरियाचा चित्रपट उतरला होता. ९२ वर्षांत एका कोरियन चित्रपटला नामांकन मिळालं होतं. विशेष म्हणजे एकूण सहा विभागासाठी 'पॅरासाइट' ला नामांकनं मिळाली होती. त्यातील चार पुरस्कार या चित्रपटानं स्वत:च्या नावे केले ही  अधोरेखित करणारी बाब होय. सर्वोत्तम चित्रपट, सर्वोत्तम पटकथा, सर्वोत्तम दिग्दर्शक, सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म या विभागात 'पॅरासाइट' नं ऑस्कर पटकावला. बाँग हून जो यानं या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. 

मेट्रोखालच्या बलाक वस्तीत राहून पोट भरणाऱ्या गरीब  कुटुंबाची ही कथा आहे. पिझ्झा बॉक्स तयार करून पोट भरणारं हे कुटुंब आहे. एका श्रीमंत कुटुंबात हे गरीब कुटुंब कामासाठी येतं आणि इथून चित्रपटाची कथा पुढे सरकते. श्रीमंत आणि गरीब या दोन वर्गामधील तफावत दिग्दर्शकानं पडद्यावर मांडली आहे.  

ब्रॅड पिटनं अभिनयासाठी पहिल्यांदाच जिंकला ऑस्कर