पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनामुळे 'सूर्यवंशी' आणि '८३' च्या प्रदर्शनाची तारीख बदलणार?

कोरोनामुळे 'सूर्यवंशी' आणि '८३' च्या प्रदर्शनाची तारीख बदलणार?

कोरोना विषाणूनं बाधित देशात आतापर्यंत ६० रुग्ण आढळून आले आहेत. तर राज्यात  एकूण ५ रुग्ण आहेत. खबरदारी  म्हणून लोकांना एकत्र एकाच ठिकाणी गर्दी न करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे अनेक सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. कोरोनामुळे  कदाचित 'सूर्यवंशी' आणि '८३' या दोन चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखेतही बदल होऊ शकतो.

तब्बल चाळीस वर्षांनी 'द बर्निंग ट्रेन'चा रिमेक येणार

'सूर्यवंशी' चित्रपट २४ मार्चला प्रदर्शित होत आहे.  तर '८३' चित्रपट १० एप्रिलला प्रदर्शित होत आहे. पुढील आठड्यापर्यंत जर परिस्थिती नियंत्रणाखाली आली  नाही तर कदाचित या दोन्ही चित्रपटांच्या प्रदर्शनाच्या तारखेत बदल होण्याची शक्यता आहे. 

'८३' चित्रपटाच्या प्री प्रमोशनसाठी मोठा इव्हेंट ठेवण्यात आला होता मात्र खबरदारीचा उपाय म्हणून तोही रद्द करण्यात आल्याचं समजत आहे. महाराष्ट्र, केरळ, राजस्थान आणि दिल्लीत कोरोना विषाणूचे बाधित आढळले असून त्यांची संख्या ६० वर पोहोचली आहे. 

'एक व्हिलन'च्या सीक्वलमध्ये दिशा- आदित्यसोबत दिसणार तारा