पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेखाबद्दल सोनी टीव्हीची जाहीर माफी

कौन बनेगा करोडपती

छत्रपती शिवाजी महाराजांच्या एकेरी उल्लेखाबद्दल सोनी वाहिनीवरचा 'कौन बनेगा करोडपती' कार्यक्रम वादात सापडला आहे. महाराजांच्या नावाचा एकेरी उल्लेख केल्याबद्दल केबीसी आणि वाहिनीवर पूर्णपणे बहिष्कार टाकण्याची मागणी नेटकऱ्यांनी केली आहे. वाहिनीविरोधात अनेकांनी ट्विट करत जाहीर नाराजी दर्शवली आहे. औरंगजेब बादशाचा आदरानं तर शिवाजी महाराजांचा  एकेरी उल्लेख केल्याबद्दल वाहिनीविरोधात वातावरण तापलं आहे.

मोबाइल नंबर विचारणाऱ्या रणवीरला नागपूर पोलिसांचं भन्नाट उत्तर

अखेर वाहिनीच्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवरुन जाहीर माफी मागण्यात आली आहे. बुधवारी प्रसारित झालेल्या केबीसीच्या भागात छत्रपती शिवाजी महाराजांचा संदर्भ देताना अनावधानानं त्यांच्या नावाचा उल्लेख एकेरी शब्दात  झाला. अनावधानानं  प्रेक्षकांच्या भावना दुखवल्याबद्दल आम्ही प्रेक्षकांची माफी मागतो असं वाहिनीनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. 

'स्वत:च्या कमाईतून हॉटेलला भाडेतत्वावर दिलेलं पतौडी पॅलेस परत मिळवलं'

'इनमेसे कौनसे शासक मुघल सम्राट औरंगजेब के समकालीन थे?' असा प्रश्न या आठवड्यात प्रसारित झालेल्या एका भागात स्पर्धकाला विचारण्यात आला होता. या प्रश्नाच्या उत्तराचे चार पर्याय देताना त्यात महाराजांच्या नावाचा उल्लेख ऐकरी करण्यात आला होता.  ट्विटरवर #Boycott_KBC_SonyTv हा हॅशटॅग वापरून अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. 

...म्हणून अभिनेत्री दीपिका विकतेय स्वत:चे कपडे