पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

आलिया- रणबीरचं लग्न? आई सोनी राजदान म्हणतात...

रणबीर- आलिया

आलिया आणि रणबीर हे बॉलिवूडमधलं सर्वाधिक चर्चेत असणारं जोडपं. गेल्या वर्षभरापासून दोघांच्या लग्नाच्या जोरदार चर्चा सुरू आहेत. आता  हे  दोघंही इटलीतील लेक कोमो परिसरात विवाहगाठ बांधणार अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. या  चर्चांमध्ये कोणतंही तथ्य नसल्याचं सोनी यांनी पुन्हा एकदा  स्पष्ट केलं आहे. 

आलिया आणि रणबीर दोघंही इटलीत लग्न करणार असल्याच्या बातम्या अनेक पोर्टलवर प्रसिद्ध झाल्या. यावर सोनी यांनी आयएनएस या वृत्तसंस्थेला प्रतिक्रिया दिली आहे. या साऱ्या बातम्या केवळ अफवा असून या बातमीत कोणतंही तथ्य नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. आलिया आणि रणबीर वर्षभरापूर्वी अभिनेत्री सोनम कपूरच्या लग्नात दिसले  होते. तेव्हा पासून या दोघांच्या अफेअरच्या चर्चा होत्या. त्यानंतर जीक्यू या मासिकाला दिलेल्या मुलाखतीत रणबीरनं आलियासोबतच्या आपल्या नात्याला  दुजोराही दिला होता. नुकत्याच पार पडलेल्या एका इव्हेंटमध्ये पुन्हा एकदा दोघांनी एकमेकांवरचं प्रेम कबुलही केलं होतं. आलिया अनेकदा कपूर कुटुंबीयांसोबत वेळ व्यतीत करतानाही दिसते. तेव्हापासून या दोघांच्या लग्नाचा विषय चर्चेत आहे.

यापूर्वीही सोनी यांनी आलिया- रणबीरच्या लग्नाचा विषय खोडून काढला  होता. आलिया माझी मुलगी आहे. मला तिला सुखी झालेलं पाहायचं आहे. तिच्या खासगी आयुष्याविषयी मी काहीच बोलणार नाही असं सोनी म्हणाल्या होत्या.