पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Video : नऊ कलाकार, सहा लोककलाप्रकारांचा 'शिवराज्याभिषेक गीता'त सुरेल संगम

शिवराज्याभिषेक गीत

शिवराज्याभिषेकावर आतापर्यंत अनेक गाणी आली. मात्र, प्रसाद ओक दिग्दर्शित 'हिरकणी' या चित्रपटातील शिवराज्याभिषेकाचे गाणे या सर्व गाण्यांमध्ये वेगळे ठरणार आहे. कारण नऊ मराठी कलाकार, सहा लोककला प्रकारांचा सुरेल संगम एकाच गाण्यात रसिक प्रेक्षकांना पहायला मिळणार आहे. हे गाणं नुकतंच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आलं आहे. 

'कुली नंबर १' च्या सेटला आग, सुदैवानं जीवितहानी नाही

अभिनेता चिन्मय मांडलेकर, जितेंद्र जोशी, हेमंत ढोमे, सिद्धार्थ चांदेकर, पुष्कर श्रोत्री, प्रियदर्शन जाधव, ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी, क्षिती जोग, राजश्री ठाकूर, संगीतकार राहुल रानडे असे प्रसिद्ध कलाकार गाण्यात पाहायला मिळणार आहेत. ओवी, पोवाडा, कव्वाली, अभंग, धनगर, शेतकरी अशा सहा पारंपरिक लोककलांना एकत्र गुंफून शिवराज्याभिषेकावर आधारित या गाण्याची निर्मिती करण्यात आली आहे.

शिवराज्याभिषेकाच्या सोहळ्याची भव्यता दर्शवण्याचा प्रयत्न या गाण्यातून करण्यात आला आहे. या गाण्याचे बोल संदीप खरे यांनी लिहिले आहेत तर अमितराज यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे. 

नीलांबरी किरकिरे, विवेक नाईक, अमितराज, दीपाली देसाई, जिया सुरेश वाडकर, गौरव चाटी, संतोष बोटे  या नवोदित गायक आणि गायिकांच्या सुमधुर आवाजात हे गाणे स्वरबद्ध करण्यात आले आहे. चित्रपटाचे लेखन चिन्मय मांडलेकर, छायाचित्रण संजय मेमाणे तर कला दिग्दर्शन संतोष फुटाणे यांचे आहे. 

अदितीनं गमावले परदेशी चित्रपट कारण ऐकून तिही झाली अवाक्

स्वराज्याच्या इतिहासात महाराजांनी  शूर आई म्हणून गौरविलेल्या हिरकणीची  कथा रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. शिवराज्याभिषेकाचा सोहळा या चित्रपटातीलच भाग आहे. आजपर्यंतच्या शिवराज्याभिषेकाच्या गाण्यांत हे गाणं निश्चितपणे वेगळं ठरेल, अशी भावना हिरकणीचे दिग्दर्शक प्रसाद ओक व्यक्त केली आहे. 

गेल्याच महिन्यात हिरकणी चित्रपटाचं पहिलं मोशन पिक्चर प्रदर्शित करण्यात आलं होतं. २४ ऑक्टोबरला हा  चित्रपट प्रदर्शित होत आहे.