पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कलम ३७० वरून ट्रोल झाल्यावर सोनम कपूरने दिले असे उत्तर...

सोनम कपूर

अभिनेत्री सोनम कपूर अलीकडे सोशल मीडियावर खूप सक्रीय असते. आजूबाजूला घडणाऱ्या वेगवेगळ्या घटनांवर ती आपले मत मांडते. आपले विचार स्पष्टपणे आणि निर्भीडपणे व्यक्त करण्यासाठी सोनम कपूर ओळखली जाते. जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० रद्द करण्याच्या मुद्द्यावरही सोनम कपूरने बीबीसी एशियन नेटवर्कला मुलाखत दिली. यामध्ये तिने मांडलेल्या विचारांवरून काही जणांनी तिला ट्रोल करण्यास सुरुवात केली. या ट्रोल करणाऱ्याना तिने उत्तर दिले आहे.

खय्याम यांच्या निधनामुळे लतादीदी दुःखी, ट्विटद्वारे आठवणींना उजाळा

सोनम कपूरने एक ट्विट करीत म्हटले आहे की, मित्रांनो, शांत व्हा. कोणत्याही गोष्टीला फिरवणे. चुकीच्या पद्धतीने तिचे आकलन करणे यातून हेच दिसते की तुम्ही किती चुकीचा विचार करता. आपण आपल्याला हवा तसाच विचार करीत असतो. पण त्यामुळे त्या व्यक्तीला काहीच फरक पडत नाही. फरक तर आपल्यावरच पडतो. यासाठी जरा आत्मचिंतन करा आणि आपापल्या कामाला सुरुवात करा.

अमली पदार्थांच्या सेवनाचा आरोप, करणनं अखेर सोडले मौन

नक्की घडले काय?
कलम ३७० रद्द करण्यावरून बीबीसी एशियन नेटवर्कला दिलेल्या मुलाखतीत सोनमने आपल्याला या विषयाबद्दल फारशी माहिती नसल्याचे सांगितले होते. त्याचवेळी पाकिस्तानशी आपले आणि आपल्या परिवाराचे चांगले संबंध आहेत, असेही ती म्हणाली होती. यावेळीच विचारलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना ती म्हणाली होती की काश्मीरमधील सध्याची स्थिती बघून खूप दुःख होते. मी पण देशभक्तच आहे. पण या विषयावर न बोलणेच योग्य होईल, असे सोनम कपूरने म्हटले होते. यावरून काही जणांनी तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यास सुरुवात केली.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:sonam kapoor trolled on article 370 scrapped from jammu kashmir and she shuts down social media trollers