पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

...म्हणून सोनम कपूरचा 'द झोया फॅक्टर' धोनीला समर्पित

सोनम कपूरची मुख्य भुमिका असलेला चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे.

सोनम कपूर आणि दलकर सलमान यांची मुख्य भुमिका असलेला 'द झोया फॅक्टर' चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सोनम कपूरचा हा चित्रपट भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी याला समर्पित असल्याचे चित्रपटाते दिग्दर्शक अभिषेक शर्माने म्हटले आहे.  

'द झोया फॅक्टर' हा चित्रपट येत्या २० सप्टेंबरला प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट अनुजा चौहान यांनी लिहिलेल्या 'द झोया फॅक्टर' पुस्तकावर आधारित आहे. २००८ मध्ये हे पुस्तक चांगलेच लोकप्रिय ठरले होते. पुस्तकातील कथानक एका क्लांयट सर्विस कंपनीमध्ये काम करणाऱ्या तरुणीच्या अवतीभोवती फिरणारे आहे. तरुणीची भारतीय क्रिकेट संघात निवड आणि संघासाठी ती कशी लकी ठरते असा प्रवास प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 

पाक पुन्हा तोंडावर आपटले, लंकेच्या मंत्र्यांनी दिला दहशतवादाचा

दिग्दर्शक अभिषेक शर्माने बॉलिवूड हंगामाला दिलेल्या मुलाखतीनुसार, हा चित्रपट धोनीला समर्पित करण्यात येणार आहे. चित्रपटात सोनम कपूर झोया सोलंकीच्या भूमिकेत दिसणार असून चित्रपटात भारतीय संघाचे नेतृत्व करणाऱ्या निखिल खोडा (दुलकर सलमान) आणि संघासाठी लकी चार्म असते. हा चित्रपट खास एका क्रिकेटरवर आधारित नाही. पण हा चित्रपट धोनीसाठी समर्पित आहे, असे अभिषेक शर्माने म्हटले आहे. 'धोनी फक्त  एक क्रिकेटर नाही तर तो एक आदर्श नेतृत्व गुण असणारे व्यक्तिमत्व आहे. त्यामुळेच हा चित्रपट त्याला समर्पित करणार आहे, असे अभिषेकने सांगितले. 

विराट-रोहित मतभेदावर शास्त्री गुरुजींनी मांडले परखड मत