पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'खूबसूरतमध्ये माझ्यासोबत कोणीही काम करायला तयार नव्हतं'

सोनम फवाद

अभिनेत्री सोनम कपूर बॉलिवूडमधली 'फॅशनिस्टा' म्हणून ओळखली जाते. गेल्या दहा वर्षांहूनही अधिक काळ ती बॉलिवूडमध्ये सक्रिय आहे. 'सावारियाँ' चित्रपटातून तिनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. 'निरजा' सारखा यशस्वी चित्रपट तिनं दिला. अभिनेता अनिल कपूर यांची ती मुलगी मात्र, बॉलिवूडमध्ये मला काम हे माझ्या  मेहनतीच्या जोरावर मिळलं,  असं ती सांगते. मी स्टारकिड असले तरी बॉलिवूडमध्ये काम करताना मला देखील अडचणी येतात. एक काळ असा होता की डिझ्नेच्या 'खूबसूरत' चित्रपटामध्ये माझ्यासोबत काम करायला एकही अभिनेता तयार होत नव्हता असं ती म्हणाली. 

रजनीकांत- अक्षयच्या '2.0' चं चीनमधलं प्रदर्शन रद्द होण्याची शक्यता

'खूबसूरतमध्ये माझ्यासोबत काम करण्यास अनेकांनी नकार दिला. अखेर पाकिस्तानी अभिनेता फवाद खान काम करण्यास तयार झाला. हा चित्रपट हिट झाला अन् फवादही भारतात सुपरहिट झाला' असं सोनम कपूर फिल्म फेअरला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.  'मी स्टार किड असले तरी या क्षेत्रात काम मी स्वत:च्या मेहनतीच्या जोरावर मिळवलं आहे. यासाठी मी ऑडिशन दिले. सावरियाँ, दिल्ली ६ हे माझ्या सुरूवातीच्या काळातले चित्रपट होते. या प्रत्येक चित्रपटाच्या ऑडिशनसाठी मी गेले होते असंही सोनमनं सांगितलं.