पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विक्की वेलिंगकर : ठेका धरायला लावणारं नवं गाणं ऐकलंत का?

विक्की वेलिंगकर

सौरभ वर्मा दिग्दर्शित मराठी चित्रपट ‘विक्की वेलिंगकर’ या सिनेमाचा काही दिवसांपूर्वी ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला असून त्याला प्रेक्षकांकडून चांगला प्रतिसाद देखील मिळत आहे. या ट्रेलरने समाजमाध्यमांवर चांगलीच हलचल निर्माण केली असून प्रेक्षकांमध्ये या चित्रपटाबद्दलची उत्कंठा अधिक ताणली गेली आहे. ‘विक्की वेलिंगकर’ चित्रपटातील गायक अवधूत गुप्ते आणि ओमकार पाटील यांच्या आवाजातील 'टीकिटी टॉक' हे गाणेदेखील प्रदर्शित करण्यात आले होते यालाही प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद मिळाला आहे. आता विक्की वेलिंगकर सिनेमाचे ‘डा रा डिंग डिंग ना’ हे दुसरे गाणे चित्रपटाच्या निर्मात्यांकडून नुकतेच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले आहे. हे गाणे पीयूष अंभोरे याने गायले आणि लिहिले असून  मनन मुंजाळ याने संगीतबद्ध केले आहे.

'गोलमाल ५' येणार, अजय- रोहितचा दुजोरा

या गाण्यामध्ये सोनाली कुलकर्णी म्हणजेच विक्की कोणाचा तरी शोध घेताना दिसत असून या गाण्यात मास्क मॅन देखील दिसत आहे. त्याशिवाय या गाण्याचा संपूर्ण मूड पूर्णपणे क्लब प्रकारचा असून हे गाणे तरुणाईला ठेका धरायला लावेल आणि तरुण मुलामुलींना हे गाणे नक्की आवडेल असा विश्वास मनन आणि पीयूषनं व्यक्त केला आहे.

टायगरनं घेतलं ८ बेडरुम्सचं आलिशान घर

विक्की वेलिंगकर या चित्रपटात सोनाली कुलकर्णी, स्पृहा जोशी, विनिता खरात, केतन सिंग, जुई पवार, गौरव मोरे, संग्राम समेळ आणि रमा जोशी या कलाकारांच्या महत्वाच्या भूमिका असून हा चित्रपट ६ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.