पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

‘विक्की वेलिंगकर’ मधल्या ‘मास्क मॅन’ या रहस्यमय भूमिकेची चर्चा

विक्की वेलिंगकर

मराठी चित्रपटसृष्टीत पहिल्यांदाच ‘मास्क मॅन’ अशा नावाची व्यक्तिरेखा एखाद्या चित्रपटात साकारली जात आहे. ‘विक्की वेलिंगकर’ या आगामी चित्रपटामध्ये ‘मास्क मॅन’ची प्रमुख व्यक्तीरेखा असून त्यामुळे या चित्रपटाबद्दलची रसिकांमधील जिज्ञासा आणि सस्पेन्स मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या थ्रिलर मराठी चित्रपटामधील या मुखवट्यामागे कोणता चेहरा लपलेला आहे याबद्दल प्रेक्षकांना उत्कंठा लागून राहिली आहे. ती ६  डिसेंबर २०१९ रोजी ‘विक्की वेलिंगकर’ प्रदर्शित होईपर्यंत ताणली जाणार आहे. या चित्रपटात सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका आहे.

कतरिनाच्या जागी स्वत:ची निवड केल्याबद्दल श्रद्धा म्हणते... 

 ‘विक्की वेलिंगकर’चे दिग्दर्शन सौरभ वर्मा यांनी केले असून निर्मिती ‘जीसिम्स’, अनुया चौहान कुडेचा, रितेश कुडेचा, सचिन लोखंडे आणि अतुल तारकर यांची आहे. ‘विक्की वेलिंगकर’चे पोस्टर नुकतेच प्रदर्शित झाले. या पोस्टरवरून ही व्यक्तिरेखा खलनायकी असल्याचे लक्षात येते. मात्र या व्यक्तिरेखेच्या मागील म्हणजेच मुखवटयामागील चेहरा कोण आहे, याबद्दलची उत्कंठा काही शमली नाही. ‘मास्क मॅन’ ही व्यक्तिरेखा  ‘विक्की वेलिंगकर’च्या कथेमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका असणार आहे. त्यामुळे या चित्रपटातला हा मुखवटाधारी खलनायक कोण असणार आहे हे येत्या काही दिवसांत समजणार आहे. 

मराठी 'गर्ल्स'चा बोल्ड अंदाज