पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

अशी साकारली सोनालीनं 'हिरकणी'

सोनाली कुलकर्णी

आपल्या बाळासाठी जीव धोक्यात घालून रायगडाचा जीवघेणा कडा उतरणाऱ्या हिरकणीची कथा प्रसाद ओक घेऊन येत आहेत. महाराजांनी गौरवलेल्या एका प्रेमळ आईची साहसकथा लवकरच मराठी रसिकप्रेक्षकांना पडद्यावर पाहायला मिळणार आहे. स्वराज्याच्या इतिहासात महाराजांनी या शूर आईला गौरवलं. जिच्या साहसाची कथा वाचून आपण लहानाचे मोठे झालो त्या मातेच्या साहसाचं दर्शन पुन्हा एकदा 'हिरकणी' चित्रपटाच्या निमित्तानं प्रेक्षकांना होणार आहे. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी  यात हिरकणीची भूमिका साकारत आहे. 

या भूमिकेसाठी सोनालीला विशेष मेहनत घ्यावी लागली. 'हिरकणीवर कविता होती त्यामुळे तिच्याबद्दल केवळ प्राथमिक माहितीच उपलब्ध होती. ही माहिती आणि थोड्या संशोधनाच्या आधारे आम्ही  हिरकणी साकारायचा प्रयत्न केला', असं  सोनाली हिंदुस्थान टाइम्सला दिलेल्या  मुलाखतीत म्हणाली. 

तब्येतीकडे लक्ष देत नाटकाचे १०० प्रयोग करण्याचा शरद पोंक्षेंचा निर्धार

'या व्यक्तीरेखेसाठी मी जवळपास ५ किलो वजन घटवलं. वर्षभरापासून मी अत्यंत साधी राहणी आत्मसात करत आहे. भाजी- भाकरी, ताक असाच माझा आहार गेल्या वर्षभरापासून आहे. रोज गडावर चढ- उतार करणारी महिला शरीरानं कशी असेन, ती कशा पद्धतीनं गड चढेन अशा अनेक बारकाव्यांचा अभ्यास मी केला', असंही सोनालीनं सांगितलं.

'हिरकणी गडावर दूध विकायची म्हणूनच मी मुंबईतल्या आरे कॉलनीत जाऊन गाईचं दूध काढायला शिकले. गोवऱ्या थापणं, गोठा साफ करणं अशा अनेक लहानमोठ्या गोष्टी मी शिकले', असंही सोनालीनं सांगितलं.

प्रेक्षकांसाठी ट्रिपल धमाका, 'सूर्यवंशी', 'सिंघम' आणि 'सिम्बा' एकाच चित्रपटात

सोनाली अनेक भूमिकांत ग्लॅमरस लूकमध्ये दिसली. 'अजिंठा', 'नटरंग' सारख्या चित्रपटांसाठी तिच्या अभिनयाचा कस लागला. मात्र तिनं आपल्या अभिनयानं सर्वांचं मन जिंकलं, आता सोनालीचे चाहते तिच्या या चित्रपटाबद्दल विशेष उत्सुक आहेत.