पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सोनाली कुलकर्णी दिसणार ‘विक्की वेलिंगकर’ या आगामी मराठी चित्रपटात

विक्की वेलिंगकर

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही लवकरच एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सोनाली ही ‘विक्की वेलिंगकर’ या आगामी मराठी चित्रपटात मुख्य अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे. नटरंग, अजिंठा, झपाटलेला-२, क्लासमेट, मितवा, हंपी यांसारख्या अनेक चित्रपटातून लोकप्रिय झालेली सोनाली आता नव्या आव्हानात्मक भूमिकेत दिसणार आहे.

मेट्रो बांधकाम परिसरात अभिनेत्रीच्या गाडीवर दगड कोसळला

‘वेळेचे पाऊल आणि वविक्की वेलिंगकरची चाहूल, फक्त काळालाच कळते!’, अशी टॅगलाईन वापरून चित्रपटाचा पहिला लूक नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ‘विक्की वेलिंगकर’ ही कॉमिक पुस्तकातील व्यक्तिरेखा आहे. सोनाली कुलकर्णी या चित्रपटात संकटांवर मात करणाऱ्या एका खंबीर नायिकेच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. 

मल्लिका शेरावत म्हणते, मुलांची जबाबदारी नको रे बाबा

सौरभ वर्मानं या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ६ डिसेंबर २०१९ रोजी हा चित्रपट प्रदर्शित होत आहे.