पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

ती काळाच्या विळख्यातून सुटू शकेल का?, ‘विक्की वेलिंगकर’ टीझर प्रदर्शित

विक्की वेलिंगकर

सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेला ‘विक्की वेलिंगकर’ चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला.  सौरभ वर्मा यांचे दिग्दर्शन असलेल्या ‘विक्की वेलिंगकर’मध्ये सोनालीबरोबरच  स्पृहा जोशी, विनिता खरात, केतन सिंग, जुई पवार, गौरव मोरे, संग्राम समेळ आणि रमा जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. हा चित्रपट ६ डिसेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

अभिनेत्रीला थकलेल्या मानधनाचे ३० लाख देण्यास निर्मात्याचा नकार

'विक्की वेलिंगकर’ ही कॉमिक पुस्तकातील व्यक्तिरेखा असून ती एक घड्याळ विक्रेता आहे. आयुष्यातील एका अनपेक्षित अशा गूढतेशी या व्यक्तिरेखेचा सामना होतो. आपल्या सर्व आव्हानांवर आणि अडचणींवर मात करत खंबीरपणे उभे राहणाऱ्या नायिकेची ही कथा आहे. 

चित्रपटाचा टीझर प्रेक्षकांची उत्कंठा वाढवणारा आहे. “ती काळाच्या विळख्यातून सुटू शकेल का?,” हे पडद्यावर उमटणारे शब्द काहीतरी अघटीत तर घडणार नाही ना, अशी धास्ती निर्माण करून जातात. विशेष म्हणजे या चित्रपटातील मास्क मॅन या गूढ व्यक्तीरेखेवरून अजूनही पडदा उठलेला नाही त्यामुळे ही गूढ व्यक्तीरेखा नेमकी कोणाची आहे याचीही उत्सुकता प्रेक्षकांना आहे. 

रानू मंडल यांचं महिला चाहतीसोबत गैरवर्तन, व्हिडीओ व्हायरल