पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

क्रिकेटर केएल राहुलला डेट करण्याविषयी सोनल म्हणते..

सोनल चौहान

क्रिकेटर्स आणि बॉलिवूड हे नातं तसं खूपच जुनं. क्रिकेटर्स बॉलिवूड अभिनेत्रींना डेट करत असल्याच्या चर्चा काही नव्या नाहीत. आतापर्यंत अनेक क्रिकेटर्सची नावं बॉलिवूड अभिनेत्रींशी जोडली गेली. विराट कोहली, हरभजन सिंग, युवराज सिंग यांसारख्या क्रिकेटर्सनं  बॉलिवूड अभिनेत्रींशी लग्नदेखील केलं. आता भारतीय क्रिकेट संघाचा युवा खेळाडू केएल राहुल याच सेलिब्रिटी अफेअर्समुळे चर्चेत आहे.

केएल राहुल अभिनेत्री सोनल चौहानला डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. मात्र सोनलनं या चर्चा फेटाळून लावल्या आहे. आम्ही फक्त चांगले  मित्र आहोत. तो  चांगला खेळाडू आणि उत्तम व्यक्ती आहे असं सोनलनं टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखती  म्हटलं आहे.

केएल राहुल हा कॉफी विथ करण शोमधील महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यामुळे वादात सापडला होता. केएल राहुलबरोबरच हार्दिक पांड्यानंही उपस्थिती लावली होती. या दोघांनी  महिलांविषयी केलेल्या आक्षेपार्ह विधानांमुळे त्या दोघांवरही  सोशल मीडियावर कडाडून टिका करण्यात आली होती.