पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'मिशन मंगल'च्या पोस्टरमध्ये अक्षयला सर्वाधिक प्रसिद्धी का? सोनाक्षीनं दिलं उत्तर

मिशन मंगल

'मिशन मंगल' हा चित्रपट येत्या १५ ऑगस्टला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनला सुरूवात झाली आहे. हा चित्रपट सत्यघटनेवर आधारित आहे, इस्त्रोमधल्या महिला वैज्ञानिकांनी भारताच्या मंगळ मोहिमेसाठी दिलेल्या योगदानावर हा चित्रपट आहे. महिला सबलीकरण, स्त्री कतृत्त्व यांचा पुरस्कार चित्रपटात केला आहे मात्र, असं असूनही अक्षयला जास्त प्रसिद्धी का असा प्रश्न अनेकदा विचारला गेला. 

सलमानच्या त्या वक्तव्यामुळे दीपिका नाराज

या चित्रपटात विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हासह अनेक कलाकार आहेत, मात्र चित्रपटाच्या पोस्टरमध्ये अक्षयचं स्थान हे मोठं आहे, यावर पहिल्यांदाच हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना सोनाक्षीनं आपलं मत व्यक्त केलं आहे. 

''खूप पूर्वी मला एक व्यक्ती म्हणाली होती, जो बिकता है वो दिखता है, हे  असंच काहीसं आहे. अक्षय हा सर्वाधिक कमाई करणारा सुपरस्टार आहे म्हणून कदाचित त्याचं स्थान प्रमोशनच्या पोस्टरमध्ये मोठं असावं'', असं सोनाक्षी म्हणाली. 

'अवतार' नाकारल्यानं झालेल्या ट्रोलिंगविषयी गोविंदा म्हणतो..

''हे सर्वांनी एकत्रितपणे केलेलं काम आहे, या चित्रपटात अनेक कलाकार आहेत मात्र कोणीही सेटवर दुजाभाव केला नाही, प्रत्येकाला समान वागणूक मिळत होती'', असं सोनाक्षीनं आवर्जून  सांगितलं.