पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'दबंग ३' मधील 'रज्जो' सोनाक्षीचा फर्स्ट लूक इन्स्टावर!

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा

हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेता याच्या दबंग १ आणि दबंग २ यांना मिळालेल्या तुफान प्रतिसादानंतर आता दबंग ३ च्या शुटिंगला सुरुवात झालीये. दबंग ३ मधील प्रमुख अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा हिनेच तिच्या इन्स्टाग्रामवरून याची माहिती दिली. इन्स्टावर तिने एक फोटो शेअर केला असून, त्या माध्यमातून दबंग तिनच्या शूटिंगला सुरुवात झाल्याचे म्हटले आहे. 

इन्स्टापोस्टमध्ये सोनाक्षीने लिहिले आहे की, रज्जो परत आलीये!!! दबंग पासून दबंग ३ मध्ये. परत घरी आल्यासारखी भावना आहे. आज शूटिंगचा पहिला दिवस आहे. मला शुभेच्छा नक्की द्या!!! इन्स्टापोस्टसोबत शेअर केलेल्या फोटोमध्ये सोनाक्षीने गडद पिंक रंगाचा बॅकलेस ब्लाऊज घातला आहे. यामध्ये तिची पाठही दिसते आहे. फोटोमध्ये तिची पिंक साडीही दिसते आहे.

सोनाक्षी सध्या तिच्या कलंक चित्रपटाच्या प्रसिद्धीमध्ये व्यग्र आहे. करण जोहर प्रॉडक्शनच्या या चित्रपटाची स्टारकास्ट तगडी आहे. त्यामध्ये अलिया भट, वरुण धवन, माधुरी दीक्षित, संजय दत्त, आदित्य रॉय कपूर यांचाही समावेश आहे. येत्या १७ एप्रिलला हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे.

इंदूरमध्ये सलमानच्या शूटिंगचा एक व्हिडिओही सध्या व्हायरल झाला आहे. आपल्या चाहत्यांना हाताने अभिवादन करतानाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात बघितला जातो आहे. या फोटोसोबत सलमानने मध्य प्रदेश पोलिस आणि त्याच्या लाखो चाहत्यांचे आभार मानले आहेत. फोटोमध्ये त्याने दबंग ३चा हॅशटॅगच्या माध्यमातून उल्लेख केला आहे. व्हिडिओमध्ये सलमानने गडद निळ्या रंगाचा शर्ट घातला असून, तो एकदम त्याच्या चुलबूल पांडे अवतारात फिट दिसतो.