पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

सलमान म्हणजे 'कागदी वाघ', गायिका सोना महापत्राची टीका

सोना- सलमान

अभिनेता सलमान खानसोबत गायिका सोना महापत्राचा वाद हा सर्वश्रुत आहे. हा वाद क्षमण्यापेक्षा सोना आगीत आणखी तेल ओतत आहे. आता चक्क तिनं सलमानला 'कागदी वाघ' म्हणत डिवचलं आहे, त्यामुळे या वादाचा आणखी भडका उडाला आहे. सलमानचा 'भारत' चित्रपट दोन आठवड्यांपूर्वी प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या कमाईत दुसऱ्या आठवड्यात कमालीची घट पहायला मिळाली त्यावरून सोनानं आपल्या ट्विटर अकाऊंटवर सलमानला टोला लगावला आहे. 

'चित्रपटाची चर्चा होती, या चित्रपटाचं जोरदार प्रमोशनही करण्यात आलं. मात्र  एका आठवड्यात चांगली कमाई करण्यास अयशस्वी झालेल्या फिल्मी सुपरस्टारला काय म्हणावं? कागदी वाघ'  अशा शब्दात ट्विट करत तिनं सलमानला टोला लगावला आहे. 

अशा कागदी वाघाला डोक्यावर चढवणं बंद करून चांगल्या हिरोचा आपण शोध घेतला  पाहिजे असं लिहित तिनं सलमानच्या जखमेवर  मीठ चोळलं आहे. सलमाच्या  'भारत' चित्रपटानं पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. मात्र दुसऱ्या आठवड्यात कमाईत घट व्हायला सुरूवात झाली. दुसऱ्या आठवड्याच्या पहिल्याच दिवशी चित्रपटाच्या कमाईत ५५% घट झाली होती.