पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

हुंड्यासाठी सासरकडून छळ, गायिकेची आत्महत्या

गायिकेची आत्महत्या

नवऱ्याचा त्रास, हुंड्यासाठी केला जाणार छळ याला कंटाळून कन्नड सिनेसृष्टीतील गायिका सुष्मिताने सोमवारी आत्महत्या केली. सासरच्या मंडळींना माफ करू नका, माझ्या आत्महत्येसाठी ते जबाबदार असल्याचं सुष्मिताने आईला पाठवलेल्या व्हॉट्सअप वॉइस मेसेजमध्ये म्हटलं आहे. 
२७ वर्षीय सुष्मितानं २०१८ मध्ये शरत कुमारशी विवाह केला होता. लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच सुष्मिता आणि शरतमध्ये वाद सुरु होते.

आदित्य नारायणसोबत लग्नाविषयी नेहा म्हणते..

शरतचे कुटुंबीय हुंड्यासाठी मानसिक त्रास द्यायचे, छळवणूक करायचे असं सुष्मितानं आत्महत्येपूर्वी पाठवलेल्या मेसेजमध्ये म्हटलं आहे. 
 आत्महत्येसाठी पती, त्याची बहिण जबाबदार असल्याचं तिनं म्हटलं आहे. आईच्या घरी रात्री उशीरा तिनं गळफास लावून आत्महत्या केली.  मी नाईलाजानं आत्महत्येचं पाऊल उचलत आहे. माझ्या आत्महत्येसाठी पती त्याची बहीण जबाबदार आहे त्यांना माफ करू नका. लग्नाच्या पहिल्या दिवसापासून त्यांनी माझा छळ केला आहे. मात्र मी तो मुकाट्यानं सहन केला त्यांना योग्य शिक्षा द्या अन्यथा माझ्या आत्म्याला शांती लाभणार नाही. तसेच भावाला माझ्यावर अंत्यसंस्कार करायला सांगा असंही तिनं म्हटलं आहे. 

'सहकुटुंब सहपरिवारा'सह सुनील- नंदिता येणार प्रेक्षकांच्या भेटीला

आत्महत्येपूर्वी तिनं भावाला मेसेज केला होता मात्र त्यांनी पहाटे तो मेसेज पाहिला तोपर्यंत सुष्मितानं टोकाचं पाऊल उचललं होतं.