पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

Bunty Aur Babli 2 : राणी-अभिषेक नाही तर हे बॉलिवूडचे नवे 'बंटी- बबली'

बंटी और बबली २

राणी- अभिषेक बच्चनची प्रमुख भूमिका असलेला 'बंटी- बबली' चित्रपट २००५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर अक्षरश: धुमाकूळ घातला होता. चित्रपटाची कथा, गाणी इतकंच नाही तर 'बंटी- बबली' पासून प्रेरित कपड्यांची नवी फॅशनही त्यावेळी बाजारात पहायला मिळाली होती. या चित्रपटाची तुफान क्रेझ होती.  राणी- अभिषेकची जोडी तर पडद्यावरची हिट जोडी ठरली होती. आता 'बंटी- बबली २' येत आहे. आश्चर्य म्हणजे या नव्या चित्रपटात  राणी- अभिषेकची जागा नव्या जोडीनं घेतली आहे. 

भाग्यश्रीच्या मुलासोबत शिल्पा करणार बॉलिवूडमध्ये पुनरागमन

'बंटी- बबली २' मध्ये सिद्धार्थ चतुर्वेदी आणि शरवरी ही नवी जोडी दिसणार आहे. सिद्धार्थनं 'गली बॉय' चित्रपटात एमसी शेर ही भूमिका साकारली होती. आदित्य चोप्रा या चित्रपटाची निर्मिती करणार असून वरुण शर्मा दिग्दर्शन करणार आहेत. चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात झाली असून  बॉलिवूडच्या या नव्या 'बंटी- बबली'वर प्रेक्षक किती प्रेम करतात हे पाहण्यासारखं ठरेन. 

साईंच्या चरणी राणी झाली भावूक, दर्शनासाठी शिर्डीत

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Siddhant Chaturvedi Sharvari to replace Abhishek Bachchan Rani Mukerji in Bunty Aur Babli 2