पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

टीव्ही अभिनेत्रीची मुलगी सावत्र वडिलांच्या हिंसाचाराची बळी

अभिनेत्रीची मुलगी घरगुती हिंसाचाराची बळी

छोट्या पडद्यावरील एका प्रसिद्ध अभिनेत्रीनं आपल्या पती विरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. कांदीवलीमधल्या समतानगर पोलिस स्थानकात तिनं पतीविरोधात तक्रार दाखल केल्याचं वृत्त स्पॉट बॉय ईनं सुत्राच्या हवाल्यानं दिलं होतं. पती सावत्र मुलीला  मारहाण करत असल्याचं तिनं तक्रारीत म्हटलं. ही मुलगी अभिनेत्रीच्या पूर्वीश्रमीच्या पतीची मुलगी आहे. या दोघांनी २००७ मध्ये घटस्फोट घेतला होता. त्यानंतर मुलीचा ताबा अभिनेत्रीकडे आला. या अभिनेत्रीनं २०१३ साली दुसऱ्या व्यक्तीशी लग्न केलं.

मुलीची हत्या करून ४० वर्षांच्या मराठी अभिनेत्रीची आत्महत्या

मात्र आता या अभिनेत्रीनं पतीविरोधात घरगुती हिंसाचाराची तक्रार दाखल केली आहे. पतीनं रागाच्या भरात सावत्र मुलीला मारहाण केल्याचा आरोप तिनं केल्याचं स्पॉट बॉय ईनं म्हटलं होतं. यावर मुलीच्या खऱ्या वडीलानं आपली काळजी व्यक्त केली आहे. वडील या नात्यानं मला  तिच्याविषयी काळजी वाटते. तिच्याविषयीची बातमी मला माध्यमातूनच कळली. मी नेहमीच तिच्या संपर्कात असतो. ती सध्या ठिक असून काळजी करण्याचं कारण नाही असं तिनं मला सांगितलं, अशी प्रतिक्रिया तिच्या वडीलांनी बॉम्बे टाइम्सला दिली आहे.

बिग बॉस मराठी : बिचुकलेंना पाण्यात उभं राहण्याची शिक्षा

दरम्यान या प्रकरणात मारहाण करणाऱ्या मुलीच्या सावत्र वडीलांना अटक केल्याचं समजत आहे. या प्रकरणात पीडित मुलीनं मौन सोडलं आहे. माझी आई नाही तर मी घरघुती हिंसाचाराची बळी ठरली आहे. सावत्र वडिलांनी मला चुकीच्या पद्धतीनं स्पर्श केला नाही, या बातम्या खोट्या आहेत मात्र अनेकदा त्यांनी माझ्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. ही टिप्पणी ऐकून कोणत्याही आईचं मन दुखावेल असं पीडित मुलीनं आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये म्हटलं आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Shweta Tiwari Ex Husband Raja Chaudhary reacts on Palak Tiwari Being Molested by Abhinav Kohli