पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

विकीवर आयुष्मान पडला भारी !

विकीवर आयुष्मान पडला भारी !

विकी कौशल  आणि आयुष्मान खुराना  या दोघांनी  २०१९ हे वर्ष गाजवलं. या वर्षांत दोघांच्या चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर चांगली कमाई करत प्रेक्षकांना चित्रपटगृहाकडे आकर्षित केलं. मात्र यावेळी विकी कौशलच्या 'भूत' चित्रपटावर आयुष्मानचा 'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपट भारी पडलाय असंच दिसतंय. 

घरी आलेल्या 'लक्ष्मी'चं शिल्पानं केलं जंगी स्वागत

विकी कौशलचा 'भूत' चित्रपट नावप्रमाणे भयपट आहे तर  चित्रपटांद्वारे विविध सामाजिक विषयांवर लक्ष वेधणाऱ्या आयुष्मानचा 'शुभ मंगल ज्यादा सावधान' चित्रपट हा समलैंगिक तरुणांच्या आयुष्यावर प्रकाश टाकणारा आहे.  या दोन्ही चित्रपटांपैकी आयुष्मानच्या चित्रपटांना चांगला प्रतिसाद लाभताना दिसत आहे. 

अक्षयनं मला जीवनदान दिलं, दिग्दर्शकानं मानले आभार

आयुष्मानच्या  'शुभ मंगल ज्यादा सावधान'नं बॉक्स ऑफिसवर ३९.६० कोटींची  कमाई केली आहे तर 'भूत' ला अल्प प्रतिसाद लाभताना दिसत आहे. 'भूत' नं आतापर्यंत २०.७८ कोटींचा गल्ला जमवाला आहे. या आणि पुढील आठवड्यात हिंदी आणि मराठीतही अनेक चित्रपट प्रदर्शित होत आहे याचा फटका दोन्ही चित्रपटांच्या कमाईला बसू शकतो.