पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'या' हॉलिवूडपटात श्रृती मराठेसह अनेक मराठी कलाकारांचा भरणा

श्रृती मराठे

देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि बॉलिवूडची 'मस्तानी' दिपिका पादुकोण यांच्या हॉलिवूड एन्ट्रीची चांगलीच चर्चा रंगल्याचे पाहायला मिळाले होते. त्यात आता मराठी कलाकारांचीही भर पडली आहे. विशेष म्हणजे एक दोन नाही तर एकाच वेळी अनेक दिग्गज मराठी कलाकार हॉलिवूडपटात झळकणार आहेत. त्यामुळे याची चर्चा तर होणारच!

विरानुष्काचे रोमँटिंक फोटो सोशल मीडियावर व्हायरल

लेखक आणि दिग्दर्शक डॉ. रवि गोडसे यांच्या आगामी Remember Amnesia या हॉलिवूडपटाच्या माध्यमातून मराठी अभिनेत्री श्रृती मराठेसह अनेक दिग्गज कलाकार प्रक्षकांच्या भेटीला येणार आहेत. यात महेश मांजरेकर, विजय पाटकर, जयवंत पाटेकर, आनंद काळे आणि मेधा मांजरेकर ही मंडळी आपल्याला दिसणार आहे. 

नवाजुद्दीन सिद्दीकी... तमन्ना भाटिया... आणि रोमान्स!

या मराठी कलाकारांसोबत हिंदी चित्रपटसृष्टीतील आणि हॉलिवूडमधी आणखी काही चेहरे देखील असतील. हॉलिवूडपटात मराठी कलाकारांचा भरणा असलेला Remember Amnesia हा चित्रपट  नोव्हेंबरमध्ये जगभरात प्रदर्शित होणार आहे.

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Shruti Marathe mahesh manjrekar and other marahti marathi actors playing role in Remember Amnesia hollywood movie