पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पत्नी नावाच्या गैरवापर, श्रेयस तळपदेचं सतर्क राहण्याचे आवाहन

श्रेयस तळपदे

अभिनेता श्रेयस तळपदेची पत्नी दिप्ती तळपदेच्या नावानं अनेक जणांची फसवणूक होत असल्याचं समोर आलं आहे. अखेर  श्रेयस तळपदेनं सोशल मीडियावर पोस्ट करत चाहत्यांना सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे. 

दिप्ती तळपदे ही अॅमेझॉनची कास्टिंग हेड असल्याचं भासवून अनेक जणांची फसवणुक केली जात असल्याचं श्रेयसच्या निदर्शनास आलं आहे. संबधीत व्यक्तीनं दिप्तीच्या फोटोचा गैरवापर करून खोटी प्रोफाईल तयार केली आहे. तसेच दिप्ती श्रेयसचा फोटो वापरून व्हॉट्स अॅप नंबरही सुरू केला आहे. याद्वारे फसवणूक करणारी व्यक्ती मॉडेल्सची माहिती  मागवून घेत आहे. मात्र माझी पत्नी अॅमेझॉनची कास्टिंग हेड नाही, तेव्हा कोणत्याही  फसवणुकीला बळी पडू नका असं आवाहन श्रेयसनं सोशल मीडियाद्वारे केलं आहे.

दिप्ती निर्माती आहे. तिनं अनेक चांगल्या चित्रपटाची निर्मिती  केली आहे मात्र अॅमेझॉनशी  तिचं काही घेणं देणं नाही. असं श्रेयसनं आपल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.