पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

बॉक्स ऑफिसवर श्रद्धा विरुद्ध श्रद्धा, 'छिछोरे' आणि 'साहो' एकाच दिवशी होणार प्रदर्शित

छिछोरे

अक्षय कुमारचा 'मिशन मंगल' आणि जॉनच्या 'बाटला हाऊस' सोबत टक्कर टाळण्यासाठी प्रभासच्या 'साहो'च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली.  मात्र आता याच दिवशी 'छिछोरे'  हा चित्रपटही प्रदर्शित होत आहे. विशेष म्हणजे बॉक्स ऑफिसवर श्रद्धाचे दोन चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होणार आहे.

ये तोहफा हमने खुद को दिया है !, कंगनानं घेतली आलिशान कार

'छिछोरे' मध्ये अभिनेता सुशांत सिंह राजपुतसोबत श्रद्धा कपूर प्रमुख भूमिकेत आहे. हा चित्रपट ३० ऑगस्टला  प्रदर्शित होत आहे. तर 'फ्रेंडशिप डे'ला या चित्रपटाचा टीझर प्रदर्शित होत आहे. तर दुसरीकडे प्रभासचा 'साहो'देखील ३० ऑगस्टलाच प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात श्रद्धा प्रभाससोबत मुख्य भूमिकेत आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर श्रद्धा विरुद्ध श्रद्धा असं चित्र पहायला मिळणार आहे.

'अवतार' नाकारणाऱ्या गोविंदाची सोशल मीडियावर खिल्ली

एकाच बॉलिवूड कलाकाराचे दोन चित्रपट एकाच दिवशी प्रदर्शित होण्याचा योग तसा क्वचितच पाहायला मिळतो. मात्र ३० ऑगस्टला हा योग रुपेरी पडद्यावर पाहायला मिळणार आहे. यापूर्वी 'साहो' चित्रपट १५ ऑगस्टला प्रदर्शित होणार होता.  बिग बजेट चित्रपटांपैकी एक असलेल्या या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख काही दिवसांपूर्वी बदलण्यात आली होती.