पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

श्रद्धा कपूर म्हणते, वरूणला माझ्या आयुष्यात आणि ह्रदयात विशेष स्थान!

वरूण धवन आणि श्रद्धा कपूर

अभिनेता वरूण धवनला माझ्या आयुष्यात आणि ह्रदयात विशेष स्थान आहे. त्याच्यासोबतच मी लहानाची मोठी झाली आहे. तो माझ्यासाठी विशेष आहे, ही भावना व्यक्त केली आहे अभिनेत्री श्रद्धा कपूर हिने. वरूण धवन आणि श्रद्धाने 'स्ट्रीट डान्सर ३ डी' सिनेमामध्ये एकत्र काम केले आहे. या पार्श्वभूमीवर तिने आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

फेशियल रेकग्निशन, ड्रोन्स, सीसीटीव्ही; संचलनासाठी दिल्लीत कडक सुरक्षा

श्रद्धा कपूर म्हणाली, वरूण आणि मी लहानपणी वेगवेगळ्या शाळांमध्ये होतो. लहानपणी ज्यावेळी अशी स्थिती असते की तुम्ही एका शाळेत आणि तुमचा मित्र दुसऱ्या शाळेत. त्यावेळी तुमच्यातील संभाषण हे मुख्यत्वे माझी शाळा तुझ्या शाळेपेक्षा कशी भारी आहे, याबद्दलच असते. आमच्या लहानपणी हेच कायम घडले. 

वरूणला बघत आणि त्याच्यासोबतच मी लहानाची मोठी झाले. त्यामुळे त्याला माझ्या आयुष्यात आणि ह्रदयात विशेष स्थान आहे. ज्यावेळी एखाद्याशी खूप घट्ट मैत्री असलेल्या सोबत काम करण्याची संधी तुम्हाला मिळते. तो तुमच्यासाठी एकदम हटके आणि आयुष्यभर लक्षात राहिल असा अनुभव असतो, असे श्रद्धा कपूर म्हणाली. 

कोणाला तरी वाचविण्यासाठी भीमा-कोरेगावचा तपास NIA कडे - अनिल देशमुख

एखाद्या चांगल्या व्यक्तीमध्ये जे काही गुण असतात ते सर्व वरूणमध्ये आहेत. त्याचे पाय कायम जमिनीवर असतात आणि तो कधीही तुमच्यासाठी उपलब्ध असतो, अशीही आठवण श्रद्धाने सांगितली.