पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कतरिनाच्या जागी स्वत:ची निवड केल्याबद्दल श्रद्धा म्हणते...

कतरिना कैफ- श्रद्धा कपूर

अभिनेत्री कतरिना कैफ ही 'स्ट्रीट डान्सर ३ डी'मध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार अशी चर्चा होती. मात्र कतरिनाच्या ऐवजी श्रद्धा कपूरची निवड या चित्रपटासाठी करण्यात आली. त्यामुळे 'स्ट्रीट डान्सर ३ डी'मध्ये आता पुन्हा एकदा वरुण धवनसोबत श्रद्धा कपूर महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.

पाकिस्तानी आहात का?, भरसभेत भाजपच्या उमेदवाराने विचारला प्रश्न

 कतरिनाऐवजी  स्वत:ची निवड करण्यात आल्याबद्दल श्रद्धानं आपलं मत व्यक्त केलं आहे. आशा गोष्टी बॉलिवूडमध्ये होतच असतात असं श्रद्धा पिंक व्हिलाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली. सायना नेहवालच्या बायोपिकमध्ये तिच्याऐवजी परिणिती चोप्राची निवड करण्यात आली. याचं उदाहरणही तिनं दिलं. काही कारणासाठी परिणितीची निवड करण्यात आली मला तो चित्रपट करणं शक्य झालं नाही, यामागे माझीही कारणं असतील मात्र तुम्ही खूश असलं पाहिजे, असं श्रद्धा म्हणाली.

अपाचे आणि राफेलमुळे पाकिस्तान घाबरला; चीनकडे मागितली मदत

श्रद्धाचा 'छिछोरे' आणि 'साहो' हे दोन चित्रपट गेल्या महिन्यात  प्रदर्शित झाले. या चित्रपटांना प्रेक्षांचा चांगला प्रतिसाद लाभला होता.