पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पिढ्यानपिढ्या चालत आलेला वारसा... श्रद्धाच्या मराठीत शुभेच्छा

श्रद्धानं मराठी प्रेक्षकांना दिल्या पाडव्याच्या शुभेच्छा

अभिनेत्री श्रद्धा कपूर हिनं तिच्या मराठी चाहत्यांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा दिल्या आहे. श्रद्धाची आई ही मराठी आहे. श्रद्धानं आपल्या इन्स्टाग्रामवर स्वत:चा, आईचा आणि आजीचा पारंपरिक मराठी वेशातला फोटो शेअर  केला आहे. 

तिसऱ्यांदा कनिका कपूरची कोरोना विषाणूची चाचणी पॉझिटिव्ह

पिढ्यानपिढ्या जपलेला पेहराव...साडी
पिढ्यानपिढ्या उभारलेला सन्मान...गुढी
पिढ्यानपिढ्या चालत आलेला वारसा...
गुढीपाडव्याच्या आणि मराठी नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा, असं लिहित  श्रद्धा कपूरनं मराठीत शुभेच्छा दिल्या आहेत. 

सध्या लॉकडाऊन असल्यानं तसेच १९ मार्चपासून चित्रीकरण बंद असल्यानं  बॉलिवूडमधील कलाकार घरीच वेळ व्यतीत करत आहेत. 'गेले काही दिवस मी एकापाठोपाठ एक अनेक चित्रपट केले. त्यामुळे मला विश्रांतीची आवश्यकता होती. आता ती विश्रांती मला  मिळाली. मी  कुटुंबीयांसोबत वेळ व्यतीत करत आहे काही गोष्टींची ओळख नव्यानं झाली आहे', असं ती हिंदुस्थान टाइम्स मराठीला दिलेल्या मुलाखतीत म्हणाली.

लग्नानंतर शार्दुलसोबत नेहानं साजरा केला पहिला गुढीपाडवा

'या गुढीपाडव्यापासून कोरोना मुक्तीचा संकल्प करु प्रत्येकानं घरात थांबा आणि आरोग्याची काळजी घ्या', असं आवाहनही तिनं केलं आहे.