पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

कोरोनाचा मनोरंजन विश्वावरही परिणाम

कोरोनाचा मनोरंजन विश्वावरही परिणाम

कोरोनाचा फटका उद्योगधंदे, वाहतूक अर्थव्यवस्थेला हळूहळू बसत आहे. याचे गंभीर परिणाम आता जगातील अनेक देशांना सहन करावे लागणार आहेत. भारतात मनोरंजन विश्वालाही याची झळ पोहोचली आहे. अनेक चित्रपटांचं चित्रीकरण चीनमध्ये होणं अपेक्षित होतं, याची आगाऊ तयारीदेखील झाली होती, मात्र कोरोनामुळे चित्रीकरण रद्द करावे लागले आहे.

कोरोना : आमिरचा चिनी चाहत्यांसाठी भावनिक संदेश

चीन आणि हाँगकाँगमध्ये  अनेक महत्त्वाचे  फिल्म फेस्टिव्हल आणि कार्यक्रम होणार होते. काही मोठ्या चित्रपटांचे प्रदर्शनही होणार होते मात्र कोरोनामुळे सर्व कार्यक्रम, प्रदर्शनं पुढे ढकलण्यात आली आहे. अनेक कार्यक्रम एप्रिलनंतर होणार आहेत. गूड न्यूज हा चित्रपट हाँगकाँगमध्ये फेब्रुवारी महिन्यात प्रदर्शित होणं अपेक्षित होता मात्र त्याच्या प्रदर्शनाची तारीखही बदलली आहे,  अशी माहिती व्यापार विश्लेषक अतुल मोहन यांनी दिली. 

'दे धक्का २' वरुन उच्च न्यायालयात सुरु असलेल्या वादावर निकाल

इंडियन २ या चित्रपटाचे चित्रीकरण चीनमध्ये होणार होतं, मात्र कोरोनामुळे चीनमधील चित्रीकरण रद्द करण्यात आलं आहे. एका बॉलिवूड चित्रपटाचं चित्रीकरणही चीनमध्ये होणं अपेक्षित होत, पण त्याच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. एप्रिल महिन्यात अमेरिकन गायक खालिद मुंबई आणि बंगळुरु शहरात टुरसाठी येणार होता, मात्र त्यानं म्युझिकल टुर रद्द केली आहे. 

वरुण धवन आणि नताशा दलाल  मे महिन्यात थायलंडमध्ये विवाहबंधनात अडकणार होते मात्र बॉलिवूडमधल्या  चर्चांनुसार हे जोडपं लग्नासाठी वेगळ्या व्हेन्यूच्या शोधात आहेत.