पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'तुझ्यात जीव रंगला' मालिकेला कोल्हापूरमधील पूरपरिस्थितीचा फटका

तुझ्यात जीव रंगला

कोल्हापूरमध्ये सुरू असलेला मुसळधार पाऊस आणि पूरपरिस्थितीचा फटका 'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेला बसला आहे. कोल्हापूरमधील वसगडे गावात या मालिकेचे चित्रीकरण सुरू आहे. मात्र  पावसामुळे गावात  ठिकठिकाणी पाणी साचलं आहे, त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव मालिकेचे चित्रीकरण दोन दिवस बंद आहे. मंगळवार आणि बुधवार दोन दिवस मालिकेचं चित्रीकरण बंद ठेवण्यात आले आहे, परिस्थिती पाहूनच चित्रीकरण सुरू करायचे की नाही  याचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती या मलिकेतील मुख्य कलाकार हार्दिक जोशी (राणा दा) नं मराठी हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना दिली आहे. 

पर्लकोटा नदीला पूर; भामरागडचा संपर्क तिसऱ्यांदा तुटला

या मालिकेतील अभिनेत्री अक्षया देवधर हिनं इन्स्टाग्रामवर इथल्या पुरस्थितीची माहिती दिली होती. अक्षया आणि धनश्रीसह मालिकेतील महिला कलाकारांच्या राहण्याची व्यवस्था जिथे करण्यात आली होती त्या परिसरात पाणी साचलं, पाण्याची पातळी वाढतच चालली होती. त्यामुळे दोघींसह अनेक कलाकारांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलं आहे, मालिकेतील सर्व कलाकार आणि संपूर्ण युनिट सुरक्षित असल्याची माहिती हार्दिक जोशीनं दिली आहे. 

कोल्हापूर, सांगलीमध्ये परिस्थिती बिघडली, पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत

त्याचप्रमाणे कोल्हापूरवासीयांना त्यानं काळजी घेण्याचं आवाहनही केलं आहे. मुंबईतील पूरसदृश्य परिस्थिती आम्ही जवळून पाहिली आहे, इथल्या गावकऱ्यांनी आम्हाला भरभरून प्रेम दिलं आहे, त्यांनी  स्वत:ची काळजी घ्यावी अशी विनंती त्यानं केली आहे, पण त्याबरोबर मुक्या जनावरांची देखील रक्षण करा, त्यांनाही पुराचा फटका बसला आहे त्यामुळे त्यांनाही सुरक्षित ठिकाणी नेण्याची व्यवस्था करा असं आवाहन त्यानं केलं आहे.