पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

देवाच्या कृपेनं लतादीदी सुखरुप, शोभा डेंची माहिती

लता मंगेशकर

देवाच्या कृपेनं लतादीदींची प्रकृती उत्तम आहे अशी माहिती लेखिका शोभा डे यांनी दिली आहे. शनिवारी दुपारी ट्विट करत शोभा डे यांनी लतादीदींच्या प्रकृतीची माहिती चाहत्यांना दिली आहे.  लतादीदींना सोमवारी पहाटे मुंबईतल्या ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांना श्वसनाचा त्रास होत होता. 

Video : नात्यातील संवेदनशीलता जपणारा 'सिनियर सिटीझन'

लतादीदींच्या  कुटुंबीयांशी संवाद साधला देवाच्या कृपेनं आपल्या सर्वांसाठी मौल्यवान असलेल्या गानकोकीळा लता मंगेशकर या सुखरुप आहेत असं ट्विट  करत  त्यांनी चाहत्यांना लतादीदींच्या प्रकृती माहिती दिली. गेल्या काही दिवसांपासून लता मंगेशकर या रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

लतादीदींची प्रकृती आता स्थिर असून त्यात सुधारणा होत असल्याची माहिती शुक्रवारी त्यांच्या कुटुंबीयांनी दिली आहे. राज ठाकरे यांनी देखील रुग्णालयात जाऊन लतादीदींची भेट घेतली होती, लतादीदींची प्रकृती सुधारतेय अशी माहिती मनसे  अध्यक्ष राज ठाकरेंनी दिली होती. 

राणी मुखर्जीचा 'मर्दानी २' वादात, कोटा शहराचं नाव मलिन केल्याचा आरोप