पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिवानी सुर्वे होणार 'साताराच्या सलमान'ची नायिका

शिवानी सुर्वे

बिग बॉसचं घर गाजवणारी शिवानी  सुर्वे लवकरच दोन मराठी चित्रपटांत दिसणार आहे. शिवानी सुर्वे ही 'साताराच्या सलमान' या आगामी चित्रपटात पाहायला मिळणार आहे. 

 'स्वप्नं बघितली तरच खरी होतात !!' अशी टॅगलाईन असलेल्या 'सातारचा सलमान' या चित्रपटाचा टिझर नुकताच प्रदर्शित झाला. तरुणींना भुरळ घालणाऱ्या सुयोग गोऱ्हेची झलक यात आपल्याला पाहायला मिळाली. या टिझरला प्रेक्षकांकडून भरभरून प्रतिसाद मिळत असतानाच उत्सुकता होती, ती 'सातारचा सलमान'ची हिरोईन कोण? याची. मात्र हे गुपित अखेर उलगडले. 'सातारचा सलमान'मध्ये शिवानी आणि सायली या दोघीही प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. 

सायली संजीव

पोस्टरवरील सायलीचा लूक पाहता ती 'माधुरी माने' या निरागस, सोज्वळ मुलीची भूमिका साकारत असून शिवानी 'दिपिका भोसले' या बोल्ड, बिनधास्त मुलीची भूमिका साकारत आहे. या चित्रपटाच्या निमित्तानं शिवानी आणि सायली या दोघीही पहिल्यांदाच एकत्र काम करणार आहेत. 
शिवानी, सायली आणि  सुयोगला एकत्र पाहण्यासाठी सगळेच उत्सुक आहेत. हा चित्रपट येत्या ११ ऑक्टोबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होत आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:shivani surve and sayali sanjiv play female lead in upcoming marathi movie satarcha salman