पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

त्यांच्यामुळे मला काम मिळेना, अभिनेत्री शिल्पा शिंदेचा आरोप

शिल्पा शिंदे

 'बिग बॉस' या रिअॅलिटी शोची विजेती आणि 'भाभीजी घर पे है'मधून लोकप्रिय झालेली अभिनेत्री शिल्पा शिंदे ही चांगल्या कामाच्या शोधात आहे. मात्र चित्रपट आणि टीव्ही कलाकारांच्या संघटनेमुळे मला काम मिळत नसल्याचा आरोप शिल्पानं केला आहे. मला चांगली संधी मिळू नये याची उत्तम खबरदारी त्यांनी घेतली आहे त्यामुळे मला चांगलं काम मिळत नसल्याचा आरोप शिल्पानं हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना केला आहे.

'बाला'चे लेखक आणि निर्मात्यांवर स्वामित्व हक्काचा भंग केल्याचा आरोप

शिल्पा शिंदेला 'भाभीजी घर पे है' या विनोदी मालिकेतून खूपच लोकप्रियता मिळाली  होती. मात्र शिल्पाचा मालिकेच्या निर्मात्यांसोबत खूप मोठा वाद झाला होता. या मालिकेच्या निर्मात्यावर तिनं लैंगिक गैरवर्तणूक, मानसिक छळ आणि मानधन अडकवल्याचा आरोप केला होता. 

चांगले चित्रपट नेहमी स्टारकिड्ससाठीच, अभिनेत्रीची खंत

बिग बॉस शो जिंकल्यानंतर शिल्पा एका चांगल्या संधीच्या शोधात आहे. मात्र चांगली संधी अजूनही वाट्याला आली नाही. जोपर्यंत चांगली संधी येत नाही तोपर्यंत वाट पाहण्याचा निर्णय  शिल्पानं घेतला आहे.  शिल्पाला अनेक वेबसीरिजच्याही ऑफर्स येत आहेत. मात्र तूर्त शिल्पानं वेबसीरिजनां होकार दिलेला नाही.