पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शिल्पा शेट्टी जवळपास १२ वर्षांनंतर बॉलिवूड चित्रपटात करणार कमबॅक

शिल्पा शेट्टी

अभिनेत्री शिल्पा शेट्टी ही बॉलिवूड चित्रपटापासून लांब गेली आहे. शिल्पा गेल्या कित्येक वर्षांपासून छोट्या पडद्यावरील अनेक रिअॅलिटी शोच्या परीक्षक पदाची जबाबदारी पार पाडत आहे. मात्र आता ती तब्बल १२ वर्षांनंतर चित्रपटात कमबॅक करणार असल्याच्या चर्चा आहे. शिल्पा दिलजित दोसांज आणि यामी गौतम यांच्या आगामी चित्रपटात प्रमुख भूमिकेत दिसणार आहे.

अक्षय-प्रभास टक्कर टळली, 'साहो'च्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली

'शिल्पानं सध्या ब्रेक घेतला आहे ती लंडनमध्ये सुट्ट्या व्यतीत करत आहे नंतर ती ग्रीसमध्ये जाणार आहे. एक महिन्यांच्या ब्रेकनंतर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात ती मुंबईत परतणार आहे. मुंबईत आल्यानंतर लगेचच चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे अशी माहिती टाइम्स ऑफ इंडियानं दिली आहे. 

'भारताच्या मंगलयान मोहिमेची किंमत माझ्या चित्रपटाच्या बजेटपेक्षाही कमी'

दिलजित दोसांज आणि यामी गौतम यांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात शिल्पा एका लेखिकेच्या भूमिकेत आहे. बऱ्याच वर्षांनंतर चित्रपटात काम करण्यास शिल्पाही तितकीच उत्सुक आहे. २००७ साली प्रदर्शित झालेल्या 'अपने' चित्रपटात शिल्पानं अभिनय केला होता. त्यानंतर 'दोस्ताना' चित्रपटासाठी तिनं एक डान्स नंबर केला होता जो सुपरहिट झाला होता.