पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तीन उकडलेल्या अंड्यासाठी हॉटेलनं आकारले १,६७२ रुपये

शेखर रवजियानी

काही दिवसांपूर्वी पंचतारांकित हॉटेलमधील महागड्या बिलाचा फटका अभिनेता राहुल बोसला बसला  होता. हे प्रकरण ताजं असताना प्रसिद्ध संगीतकार शेखर रवजियानी यानंही असाच काहीसा अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

अहमदाबादमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शेखरकडून  तीन अंड्यांसाठी तब्बल १ हजार ६७२ रुपये इतकं बिल आकारण्यात आलं आहे. त्या बिलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

'गंगूबाई कोठेवाली' यांच्या भूमिकेसाठी या अभिनेत्रींना होती पहिली पसंती

कामानिमित्त अहमदाबादमधील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शेखरनं तीन  अंडी मागवली होती. या हॉटेलनं तीन अंड्यासाठी १ हजार ६७२ रुपये  आकारले. यात तीन अंड्याचे १३५०,  सर्व्हिस चार्ज ६७.५० रुपये आणि १८% जीएसटी आकारला होता. 

शेखरनं या बिलाचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. यापूर्वी एका पंचतारांकित हॉटेलमध्ये राहुल बोसकडून २ केळींसाठी ४४२ रुपये आकारण्यात आले होते. 

Video : नात्यातील संवेदनशीलता जपणारा 'सिनियर सिटीझन'