पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शरद पोंक्षे 'अग्निहोत्र २' मध्येही दिसणार

शरद पोंक्षे

कॅन्सरमुळे काही काळ मनोरंजनाच्या विश्वातून लांब राहिलेले शरद पोंक्षे 'अग्निहोत्र २' च्या निमित्तानं बऱ्याच काळानंतर छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत. काही वर्षांपूर्वी स्टार प्रवाहवरील गाजलेली मालिका 'अग्निहोत्र' परत येतेय. या मालिकेचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.  नुकतीच 'अग्निहोत्र २'  या मालिकेची  अधिकृत घोषणा वाहिनीनं केली. तेव्हापासूनच प्रेक्षक कमालीचे उत्सुक होते. 

..म्हणून 'सांड की आंख' करमुक्त करण्याचा अरविंद केजरीवाल यांचा निर्णय

आता वाहिनीनं मालिकेचा नवा प्रोमो शेअर केला आहे. या मालिकेच्या दुसऱ्या भागत शरद पोंक्षे  पुन्हा एकदा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. महादेव अग्निहोत्री ही भूमिका त्यांनी साकारली होती. या मालिकेच्या चित्रीकरणाला सुरूवात झाली आहे रसिकप्रेक्षकांना पुन्हा तोच आनंद  अनुभवायला मिळणार असं लिहित शरद पोंक्षे यांनी सेटवरचा फोटो आपल्या फेसबुक अकाऊंटवर शेअर केला आहे. २५ नोव्हेंबरपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.

या व्यतिरिक्त शरद पोंक्षे हे 'हिमालयाची सावली' या नाटकातही काम करत आहे. 

बॉलिवूडच्या दिवाळी पार्टीत कलाकारांचा ग्लॅमरस अंदाज