पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'भुज'मध्ये राणा डगुबत्तीऐवजी मराठमोळ्या शरद केळकरची वर्णी

शरद केळकर

'भुज- द प्राइड ऑफ इंडिया'मध्ये आता बाहुबली फेम राणा डगुबत्तीऐवजी मराठमोळा अभिनेता  शरद केळकरची वर्णी  लागली आहे. त्यामुळे अजय देवगनसोबत शरद दुसऱ्यांदा चित्रपटात दिसणार आहे. यापूर्वी अजय आणि शरद केळकरनं तान्हाजी द अनसंग वॉरियर या चित्रपटात एकत्र काम केलं होतं. तब्येतीच्या कारणानं तसेच चित्रीकरणासाठी तारखा उपलब्ध नसल्यानं राणानं या चित्रपटातून माघार घेतली होती. 

शरद या चित्रपटात एका सैन्याधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. शरदनं या चित्रपटात काम करणार असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.  'भुज- द प्राइड ऑफ इंडिया'ला १९७१ च्या भारत- पाकिस्तान युद्धाची पार्श्वभूमी आहे. या युद्धातील भारतीय वायूसेनेच्या  शौर्याची कहाणी पहायला मिळणार आहे. 

अभिनेत्रीच्या घरावर प्राप्तिकर विभागाची धाड, २५ लाखांची रोकड जप्त

भारत- पाकिस्तान युद्धात  भारतीय वायूसेनेबरोबरच गुजरातमधील  कछ जिल्ह्यातील ३०० गावकरी महिलांचे योगदान खूप महत्त्वपूर्ण होतं. हल्ल्यात कछमधली भारतीय वायूसेनेची एकमेव धावपट्टी उद्धवस्त झाली. जीवाला धोका असतानाही ही धावपट्टी पुन्हा बांधण्यात या महिलांनी महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. त्यांच्या शौर्याची, जिद्दीची कहाणी या चित्रपटातून पहायला मिळणार आहे. या चित्रपटात अजय देवगन हा महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे तो स्क्वाड्रन लीडर विजय कार्णिक यांची भूमिका साकारत आहे. हा चित्रपट १४ ऑगस्ट २०२० ला प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात अजयबरोबरच संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा सारखे अनेक कलाकार पहायला मिळणार आहेत.

अभिनेत्याला चाहतीकडून त्रास, कौटुंबिक जीवनावर परिणाम