पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'तान्हाजी'मध्ये हा मराठी अभिनेता शिवाजी महाराजांच्या भूमिकेत

मराठी अभिनेता साकारणार महाराजांची भूमिका

अभिनेता  अजय देवगनची प्रमुख भूमिका असलेल्या 'तान्हाजी : द अनसंग वॉरियर' चित्रपटाविषयी मराठी प्रेक्षकांना खूपच उत्सुकता आहे. स्वराज्य निर्मितीच्या पवित्र कार्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या शूर योद्धा  तान्हाजी मालुसरे यांचा जीवनपट या चित्रपटात आहे.  स्वराज्याच्या  इतिहासात ज्यांच्या शौर्याची कथा सूवर्णाक्षरात कोरली आहे अशा तान्हाजी मालुसरेंची भूमिका अजय देवगन  साकारत आहे.

पानिपत : मराठ्यांच्या पराक्रमाची गाथा सांगणारं 'मर्द मराठा' शौर्यगीत

विशेष म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार याची उत्सुकता तमाम मराठी प्रेक्षकांना होती.  महाराजांची भूमिका सलमान खान साकारणार अशीही चर्चा तेव्हा होती. मात्र  महाराजांची भूमिका साकारण्याचा मान मराठी अभिनेता शरद केळकरला मिळाला आहे.  शरद केळकरनं हे आव्हान पेललं असून महाराजांच्या भूमिकेतील शरद केळकरचा फोटो अजयनं सोशल मीडियावर शेअर केला आहे. 

लतादीदी लवकर बऱ्या व्हा; राज ठाकरेंची प्रार्थना

पत्थर से ठोकर तो सब खाते है, पत्थर को ठोकर मारे वो मराठा’ अशी ओळ लिहित  अजयनं शरदचा फर्स्ट लूक प्रेक्षकांच्या भेटीला आणला आहे. तर दुसरीकडे चित्रपटातील आणखी दोन कलाकारांची ओळख अजयनं करुन दिली आहे. पद्मवती राव या जिजाऊंच्या भूमिकेत आहेत. तर ल्यूक केनी हा औरंगजेबच्या भूमिकेत आहे. 

लग्नाच्या पहिल्या वाढदिवसानिमित्तानं दीपिका- रणवीरचं देवदर्शन

ओम राऊत दिग्दर्शित हा चित्रपट १० जानेवारी २०२० मध्ये प्रदर्शित होत आहे. हा अजय देवगनचा १०० वा चित्रपट आहे. 

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Sharad Kelkar playing Chhatrapati Shivaji Maharaj in Ajay Devgn Tanhaji The Unsung Warrior