प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या 'शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा'साठी वरुण धवन, अनुष्का शर्माच्या ‘सुई धागा’ची निवड करण्यात आली आहे. ‘शांघाय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव -द बेल्ट अँड रोड फिल्म वीक’ची सुरुवात शनिवार २२ जूनपासून होणार आहे. या चित्रपट महोत्सवात ‘सुई धागा’ हा चित्रपटदेखील दाखवला जाणार आहे.
छोटय़ा गावात राहणारा मौजी (वरुण धवन) आणि त्याची पत्नी ममता (अनुष्का शर्मा) यांची ही कथा आहे. कपडे शिवण्याची कला असलेला मौजी आपली पत्नी ममतासोबत स्वत:चा फॅशन ब्रँड आणण्याचं एक स्वप्न पाहतो. हे स्वप्न प्रत्यक्षात उतरवताना असंख्य अडचणींचा समाना या जोडप्याला करावा लागतो. मात्र तरीही अडचणींपुढे मान न झुकवता ते मेहनत घेतात आणि स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करण्यास यशस्वी होतात. त्याची ही यशोगाथा चित्रपटात दाखवली आहे.
Mauji mamta shall be at the Shanghai international film festival as the only hindi film film choosen for the competiion pic.twitter.com/huHdP7EDyt
— Varun Dhawan (@Varun_dvn) June 15, 2019
मेड इन इंडिया चित्रपट तिथल्या प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरेल, इथल्या प्रेक्षकांप्रमाणे या चित्रपटालाही प्रेक्षकांचा प्रतिसाद लाभेल अशी आशा वरुण धवननं व्यक्त केली आहे. तर 'जगभरातील प्रेक्षकांना आनंद देण्याची ताकद या चित्रपटात आहे. कॉम्पिटिशन कॅटगरीमध्ये आमच्या चित्रपटाची निवड झाली आहे याचा आनंद आहे, असं अनुष्का शर्मा म्हणाली.