पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

रणवीर सिंगच्या 'जयेशभाई जोरदार'मधून ही अभिनेत्री करतेय बॉलिवूडमध्ये पदार्पण

जयेशभाई जोरदार

काही दिवसांपूर्वीच रणवीर सिंगच्या 'जयेशभाई जोरदार' या चित्रपटाचा पहिला पोस्टर लाँच करण्यात आला. रणवीर सिंगची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात रणवीरसोबत कोणती अभिनेत्री दिसणार याची उत्सुकता सर्वांना होती आता अभिनेत्रीच्या नावावरुन पडदा उठला आहे. 

सख्ख्या नात्याहून अधिक घट्ट आहे लतादीदी- दिलीप कुमारांचं नातं

'अर्जुन रेड्डी' या प्रसिद्ध तेलगू चित्रपटात दिसलेली अभिनेत्री शालिनी पांडे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. रणवीरसोबत बॉलिवूडमध्ये पदापर्ण करतेय ही माझ्यासाठी खूपच आनंदाची बाब आहे. रणवीर हा बॉलिवूडमधला सध्याचा आघाडीचा आणि बहुआयामी व्यक्तीमत्त्व असलेला कलाकार आहे, अशी प्रतिक्रिया शालिनीनं हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना दिली. शालिनीनं या चित्रपटासाठी ऑडिशनही दिली असल्याचं समजत आहे.  २५ वर्षीय शालिनीनं रंगभूमीवरून आपल्या करिअरची सुरुवात केली. त्यानंतर तिनं तेलगू चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. 

'मेकअप'मध्ये दिसणार 'आर्ची' आणि चिन्मय

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A grateful heart🙏🏽

A post shared by Shalini (@shalzp) on

रणवीर  'जयेशभाई जोरदार' या चित्रपटात एका गुजराथी मुलाची भूमिका साकारताना दिसणार आहे. रणवीरनं या भूमिकेसाठी आपलं वजनही कमी केलं आहे. आतापर्यंत रणवीरनं साकारलेल्या भूमिकेपेक्षा ही भूमिका नक्कीच खूप वेगळी आणि हटके ठरणार आहे. 'जयेशभाई हा हिरो आहे. तो एक सर्वसामान्य माणूस आहे ज्याच्या आयुष्यात एक गंभीर समस्या उद्भवते, अशावेळी हाच सर्वसामान्य माणूस एक  असामान्य कृती करत या संकटातून मार्ग काढतो. समाजात स्त्री- पुरुषांना समान वागणूक मिळाली पाहिजे असं मानणारी ही व्यक्तीरेखा असल्याचं रणवीरनं हिंदुस्थान टाइम्सशी बोलताना सांगितलं.

 

लष्करातील शूरवीरांवर मालिका, महेंद्रसिंग धोनी करणार निर्मिती

  • Marathi News: संबंधित इतर बातम्या वाचण्यासाठी आम्हाला लाईक करा आणि फॉलो करा.
  • Web Title:Shalini Pandeywill make her Bollywood debut opposite Ranveer Singh in Jayeshbhai Jordaar