पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शाहिदला आयुष्यातून 'ती' आठवण कायमस्वरूपी पुसायची आहे

शाहिद कपूर

अभिनेता शाहिद कपूरचा  'कबीर सिंह' हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. हा चित्रपट शाहिदच्या करिअरमधला सर्वोत्कृष्ट चित्रपट असल्याचं कौतुक प्रेक्षकांनी केलं.  बॉलिवूडमधल्या करिअरमध्ये शाहिदनं 'इश्क विश्क', 'विवाह', 'जब वी मेट','कमिने', 'उडता पंजाब', 'पद्मावत' सारखे अनेक सुपरहिट चित्रपट दिले. मात्र शाहिदचे काही चित्रपट हे प्रेक्षकांच्या अजिबात पसंतीस उतरले नाही. यातल्या एका चित्रपटाची आठवण मला कायमस्वरूपी पुसायची आहे असं शाहिद म्हणाला. हा चित्रपट म्हणजे २०१५ साली प्रदर्शित झालेला 'शानदार' चित्रपट होय. 

शाहिदच्या 'कबीर सिंह'नं रचला नवा विक्रम

या चित्रपटात शाहिदबरोबर आलिया भट्ट आणि त्याचे वडील पंकज कपूर मुख्य भूमिकेत होते. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर पूर्णपणे आदळला. शक्य झालं तर मला या चित्रपटाची आठवण कायस्वरूपी माझ्या करिअरमधून पुसायची आहे असं शाहिद झूम टिव्हीवरच्या एका कार्यक्रमात म्हणाला. मी माझ्या करिअरमध्ये काही वाईट चित्रपटही दिले असं शाहिदनं कबुल केलं. हे चित्रपट मला कधीही पाहायला आवडणार नाही, त्यासाठी मी माझा वेळ अजिबात वाया घालवणार नाही असंही शाहिद म्हणाला. 

'कबीर सिंह' च्या स्क्रीनिंगसाठी एक्स कपल हरलिन- विकीची उपस्थिती

दुसरीकडे शाहिदच्या कबीर सिंहनं पहिल्यादिवशी नवा विक्रम रचला आहे.  प्री बुकिंगमधून सर्वाधिक कमाई करणारा हा २०१९ मधला तिसरा चित्रपट ठरला आहे.