पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शाहिद म्हणतो, प्रियांकानं लग्नाला बोलावलं पण करिनानं नाही

शाहिद कपूर

अभिनेता शाहिद कपूर सध्या 'कबीर सिंग'च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे.  शाहिद हा बॉलिवूडचा चॉकलेट बॉय म्हणूनही ओळखला जातो. मीरा राजपूतशी विवाहबंधनात अडकण्यापूर्वी शाहिदचं नाव यापूर्वी करिना कपूर, प्रियांका चोप्रा यांच्याशी जोडलं गेलं. करिना कपूर आणि शाहिदच्या नावाची चर्चा त्यावेळी बॉलिवूडमध्ये खूपच होती. शाहिदसोबत ब्रेकअप झाल्यानंतर करिना सैफ अली खानसोबत विवाहबंधनात अडकली.

बिग बॉस मराठी २ : शेफ पराग शिकवणार प्रेमाची रेसिपी

शाहिदनं नुकतीच नेहाच्या BFFs with Vogue या चॅटशोमध्ये उपस्थिती लावली. यावेळी प्रियांकानं मला लग्नाचं आमंत्रण दिलं मात्र करिनानं मला लग्नाला बोलावलं नाही असंही तो म्हणाला. या गोष्टीला आता फार काळ लोटला आहे त्यामुळे मला नेमकं  आठवत नाही. मात्र बहुतेक करिनानं मला लग्नाचं आमंत्रण पाठवलं नव्हतं असं  शाहिद या शोमध्ये म्हणाला असल्याचं मुंबई मिररनं म्हटलं आहे. 

वयानं मोठ्या असलेल्या सलमानच्या आईची भूमिका साकारण्याविषयी सोनाली म्हणते...

शाहिदचा 'कबीर सिंग' हा चित्रपट येत आहे. किआरा अडवाणी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी शाहिदनं नेहाच्या शोमध्ये उपस्थिती लावली  होती या दरम्यान शाहिदनं अनेक किस्से सांगितले.