पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

शाहिदच्या 'कबीर सिंह'नं रचला नवा विक्रम

कबीर सिंह

शाहिद कपूर आणि किआरा अडवाणी यांची प्रमुख भूमिका असलेला 'कबीर सिंह'  चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला. या  चित्रपटाला समीक्षकांकडून समीश्र प्रतिसाद  आला तर प्रेक्षकांना मात्र हा चित्रपट खूपच आवडला. विषेश म्हणजे शाहिदनं साकारलेला 'अँग्री यंग मॅन' प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. शाहिदच्या सर्वोत्तम कामापैकी हे एक असल्याचं कौतुकही प्रेक्षकांनी केलं.

आलियामुळे सलमाननं किआराला दिला नाव बदलण्याचा सल्ला

शाहिदच्या 'कबीर सिंह'नं आता नवा विक्रमही रचला आहे. 'कबीर सिंह'  हा प्री बुकिंगमधून सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. मार्व्हल स्टुडिओच्या 'अॅव्हेजर्स एंडगेम'  आणि सलमानच्या 'भारत'नंतर प्री बुकिंगमधून  सर्वाधिक कमाई करणारा हा तिसरा चित्रपट ठरला असल्याचं बॉक्स ऑफिस इंडिया डॉट कॉमनं म्हटलं आहे.  प्री  बुकिंगमधून 'कबीर सिंह'नं ११.५० कोटींची कमाई केली आहे. 

शाहिदला वाटत होती कॉलेज विद्यार्थ्याची भूमिका साकारण्याची भीती

यापूर्वी सलमानच्या 'भारत'नं प्री बुकिंगमधून  २४ कोटींची  तर 'अॅव्हेजर्स एंडगेम'नं ४९ कोटींची कमाई केली होती. शाहिदचा 'कबीर सिंह' हा चित्रपट तेलगु  सुपरहिट चित्रपट 'अर्जुन रेड्डी'चा  रिमेक आहे. भारतातल्या ३१२३ स्क्रीनवर तर जगभरातल्या ४९३ स्क्रीनवर तो २१ जूनरोजी प्रदर्शित झाला.