पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

'कबीर सिंह'ची बॉक्स ऑफिसवर डबल सेंच्युरी

कबीर सिंह

शाहिदचा 'कबीर सिंह'  चित्रपट प्रदर्शित होऊन दोन आठवडे उलटले आहेत. दोन्ही आठवड्यात रेकॉर्ड ब्रेक कमाई केल्यानंतर आता चित्रपटानं २०० कोटींच्या क्लबमध्ये एण्ट्री केली आहे. २०० कोटींचा गल्ला जमवणारा  अ प्रमाणपत्र मिळालेला हा बॉक्स ऑफिसवरचा पहिलाच चित्रपट आहे.  त्याचप्रमाणे बॉक्स ऑफिसवर डबल सेंच्युरी करणारा हा शाहिदच्या करिअरमधला पहिलाच चित्रपट ठरला आहे. 

आलिया भट्टमुळे सलमाननं किआराला दिला नाव बदलण्याचा सल्ला

यापूर्वी प्री बुकिंगमधून सर्वाधिक कमाई करणारा हा २०१९ मधला तिसरा चित्रपट ठरला आहे.  याआधी हॉलिवूडच्या 'अॅव्हेंजर्स एंडगेम' आणि सलमानच्या 'भारत'नं प्री बुकिंगमधून सर्वाधिक कमाई केली होती.

चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शनं दिलेल्या माहितीनुसार चित्रपटानं तिसऱ्या आठवड्यात २०० कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. क्रिकेट विश्वचषकाचा फिव्हर असतानाही चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद लाभताना दिसत  आहे.

हा  चित्रपट २१ जून रोजी देशभरातील ३ हजार १२३ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. शाहिदसोबत किआरा अडवाणीचीही प्रमुख भूमिका या चित्रपटात आहे. 'कबीर सिंह' हा तेलगु चित्रपट 'अर्जुन रेड्डी'चा रिमेक आहे.