पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

पहिल्याच दिवशी 'कबीर सिंह'नं कमावले इतके कोटी

कबीर सिंह

 'कबीर सिंह' हा चित्रपट शाहिदच्या करिअरमधला पहिल्याच दिवशी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट ठरला आहे. तेलगु चित्रपट 'अर्जुन रेड्डी'चा रिमेक असलेल्या या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर २० कोटींहून अधिकची कमाई केली आहे. 

'लाल सिंग चड्ढा'साठी करिनाचा आमिरला होकार

हा  चित्रपट २१ जून रोजी देशभरातील ३ हजारांहून अधिक चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटानं २०. २१ कोटींची कमाई केली असल्याचं  चित्रपट व्यापार विश्लेषक तरण आदर्शनं म्हटलं आहे. या चित्रपटाचा समावेश आता २०१९ मधल्या सर्वाधिक कमाई करणाऱ्या चित्रपटाच्या यादीत झाला आहे. 

शाहिदसोबत किआरा अडवाणीचीही प्रमुख भूमिका या चित्रपटात आहे. या चित्रपटानं प्री बुकिंगमधून सर्वाधिक कमाई करण्याचा विक्रमही रचला आहे.  मार्व्हल स्टुडिओच्या 'अॅव्हेजर्स एंडगेम'  आणि सलमानच्या 'भारत'नंतर प्री बुकिंगमधून  सर्वाधिक कमाई करणारा हा तिसरा चित्रपट ठरला असल्याचं बॉक्स ऑफिस इंडिया डॉट कॉमनं म्हटलं आहे.  प्री  बुकिंगमधून 'कबीर सिंह'नं ११.५० कोटींची कमाई केली आहे.