पुढील बातमी

class="fa fa-bell">ठळक बातम्या:

तीन दिवसांत 'कबीर सिंग'ची रेकॉर्ड ब्रेक कमाई

शाहिद कपूर

'कबीर सिंह' हा पहिल्या आठवड्यात सर्वाधिक कमाई करणारा शाहिदचा पहिलाच चित्रपट ठरला आहे. या  चित्रपटाला प्रेक्षकांकडून तुफान प्रतिसाद  लाभला आणि तीन दिवसांत चित्रपटानं ७० कोटींहून अधिकची कमाई केली. 

हा  चित्रपट २१ जून रोजी देशभरातील ३ हजार १२३ चित्रपटगृहात प्रदर्शित झाला. या चित्रपटानं पहिल्या दिवशी २०.२१ कोटी, दुसऱ्या दिवशी २२.७१ कोटी आणि तिसऱ्या दिवशी २७.९१ कोटींची कमाई केली. तीन दिवसांत या चित्रपटानं ७०. ८३ कोटींची कमाई केली. तीन दिवसांत ७० कोटी कमावणारा हा शाहिदचा पहिलाच चित्रपट ठरला आहे. 

यापूर्वी 'पद्मावत' चित्रपटानं चांगली कमाई केली होती. मात्र या चित्रपटात शाहिदव्यतिरिक्त दीपिका आणि रणवीरदेखील प्रमुख भूमिकेत होते. यापूर्वी 'कबीर सिंह' नं प्री बुकिंगमधून सर्वाधिक कमाई केली होती. मार्व्हल स्टुडिओच्या 'अॅव्हेजर्स एंडगेम'  आणि सलमानच्या 'भारत'नंतर प्री बुकिंगमधून  सर्वाधिक कमाई करणारा हा तिसरा चित्रपट ठरला असल्याचं बॉक्स ऑफिस इंडिया डॉट कॉमनं म्हटलं आहे.  प्री  बुकिंगमधून 'कबीर सिंह'नं ११.५० कोटींची कमाई केली आहे. 

शाहिदसोबत किआरा अडवाणीचीही प्रमुख भूमिका या चित्रपटात आहे. तेलगु चित्रपट 'अर्जुन रेड्डी'चा 'कबीर सिंह' रिमेक आहे.